पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:लोकांत चांगुलपणा शोधा,‎वाईटपणा सर्वांमध्येच असतो

वाईटामध्ये वाईट शोधणे ही वाईट गोष्ट नाही. पण, जर याची सवय‎जडली, तर आपण चांगल्या गोष्टीतही वाईट शोधू लागतो. इथूनच‎नकारात्मकता आपल्या मनात घर करू लागते. स्वतःचे खूप बारकाईने‎मूल्यमापन करा. जर तुम्ही स्वतःमध्ये येणाऱ्या नकारात्मकतेचे कारण‎शोधायला गेलात, तर एक कारण असेही सापडेल की, आपण प्रत्येक‎गोष्टीत दोष तर शोधत नाही ना? संशय तर घेत नाही ना? नेहमी वाईटच‎तर विचार करत नाही ना? जर तुम्हाला दुसऱ्यांमधील चांगुलपणा‎पाहायचा असेल, तर विश्वास, सहकार्य, आदर आणि भरवसा या गोष्टी‎टिकवून ठेवा. सध्या राजकारणाच्या जगात या चारही गोष्टींचा अभाव‎आहे. अटल आणि अडवाणी यांनी या चार गोष्टींचा आदर्श निर्माण केला‎होता. त्यांनी एकमेकांशी अत्यंत सामंजस्याचे संबंध ठेवले होते. आपणही‎आपला स्वभाव असाच बनवूया. चांगुलपणा शोधा, वाईटपणा तर‎सर्वांमध्येच असतो. जेव्हा रावण शेवटचा श्वास घेत होता, तेव्हा‎श्रीरामांनी त्याला बाण मारला होता. पण मरणासन्न अवस्थेतील रावणाला‎पाहूनही रामांनी लक्ष्मणाला सांगितले होते की, ‘जा आणि या विद्वानाकडून‎काहीतरी शिकून घे, कारण याच्यासारखे लोक पृथ्वीवर पुन्हा जन्माला‎येत नाहीत.’ अशी दृष्टी ठेवा. सकारात्मकता आपोआप तुमच्यात उतरेल.‎


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *