कल्पना करा की, जगापासून दूर डोंगरावर एक माणूस एकापायावर उभा राहून तपश्चर्या करत आहे. त्याची शक्तीवाढत चालली आहे, आता त्याला कुणीही रोखू शकत नाहीअसे वाटते. अशातच त्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी एकअप्सरा येते. अनेक दिवस तो तपस्वी अजिबात विचलितहोत नाही, पण एके दिवशी त्याचे मन मोहाला बळी पडते.तो हळूच एक डोळा उघडतो आणि बस, अप्सरेचा बाणथेट निशाण्यावर लागतो. वर्षानुवर्षांची तपश्चर्या वाया जातेआणि तो तपस्वी पुन्हा एक सामान्य माणूस बनतो. ही कोणतीही पौराणिक कथा नाही. नुकतेच अमेरिकेतीलसर्वात शक्तिशाली कंपनीच्या मालकासोबत नेमके हेचघडले आहे. तुम्ही म्हणाल, ते कोणत्या डोंगरावर चढूनतपश्चर्या करत होते? तर माझे असे मानणे आहे की,स्वतःचे स्टार्टअप सुरू करणे ही एक प्रकारची तपश्चर्याचआहे. जग एका वाटेवर असते, तर तुम्ही वेगळ्याच वाटेवरअसता. माणसाच्या डोक्यावर इतक्या जबाबदाऱ्या असतातकी, त्या बॅलन्स करणे म्हणजे एका पायावर उभेराहिल्यासारखेच वाटते. खूप संघर्ष करावा लागतो; जगाशीआणि स्वतःशीही, तेव्हा कुठे यश मिळते. आणि मग येतेमोहित करणारी अप्सरा! 33 वर्षांच्या तपश्चर्येतून जेन्सेन हुआंग यांनी एक अशीकंपनी उभी केली, जिच्या जोरावर संपूर्ण एआय क्रांतीटिकून आहे. पण कदाचित ते हे विसरले की, ज्याला देवशक्तीचे वरदान देतो, त्याच्यासमोर एक अप्सराही प्रकटहोते! जेन्सेन यांचा पाय घसरला आणि त्यांचे जगच बदलूनगेले. कंपनी हातातून गेली आणि प्रतिष्ठाही. लोक त्यांच्याचएआयचा वापर करून, मीम्स बनवून त्यांचीच खिल्लीउडवत आहेत! माणसाने तोंड तरी कुठे लपवावे? असो, माझ्या सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, कुणी कितीहीश्रीमंत असो किंवा शक्तिशाली असो, पण सृष्टीचा नियमआहे - त्याचीही परीक्षा होतेच! तपश्चर्येत मग्न राहायचे कीडोळे उघडायचे, हा निर्णय तो स्वतः घेतो. डोळेउघडल्यानंतरही, जे आपल्याला मोहात पाडत आहे त्याकडेदुर्लक्ष करण्याची संधी त्याच्याकडे असते. आंतरिक शक्तीयालाच म्हणतात. पण एकदा का पाय घसरला, तर मग तुम्ही बाहेरच्या जगालाकितीही फसवण्याचा प्रयत्न करा, ती शक्ती आतातुमच्याकडे राहिलेली नसते. जेन्सेन यांच्या कथेत एकनाही, तर अनेक ‘अप्सरा’ समोर आल्या आहेत. पण मोहातपाडणारी व्यक्ती ही कुणी जिवंत, सुंदर स्त्रीच असेल असेनाही. मनाचे अनेक मोह असतात, पैशाची अनेक प्रलोभनेअसतात. ही सर्व ‘अप्सरेची’च रूपे आहेत; म्हणजेचतपश्चर्या भंग करणारी साधने. तुम्ही म्हणाल, मी तर तसाही सामान्य माणूस आहे, माझा यासगळ्याशी काय संबंध? तर मी म्हणेन की, या पृथ्वीवर जोकुणी मनुष्यरूपात जन्माला आला आहे, तो इथे तपकरण्यासाठीच आला आहे. सुरक्षित राहायचे असेल, तरतुम्हालाही योग्य निवड करावीच लागेल. अप्सरा येते,मनाला भुरळ घालते. फोन पुन्हा पिंग होतो, तुमचाएकाग्रतेचा भंग होतो. लग्नानंतर डेटिंग करताय, जगाच्यानजरेला घाबरताय. बँक बॅलन्सपेक्षा मोठे असते कॅरेक्टर. पुराणांमध्ये म्हटले आहे की, कठोर तपश्चर्या हीदेवलोकासाठी समस्या बनत असे. देवलोक डळमळीतव्हायचा, इंद्रदेव अस्वस्थ व्हायचे. आजही कुणाची प्रगतीपाहून लोक हादरतात आणि त्याला पडताना पाहूनसुखावतात. पण लक्षात ठेवा, बाहेरचा धोका कमी आहे,जर तुमच्या कॅरेक्टरमध्ये दम आहे!अप्सरा येईल, तिलाअजिबात भाव देऊ नका. आपल्या जवळही येऊ देऊ नका.(हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
- मुंबई: सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या निषेधाचा प्रताप अंगलट! पुस्तकासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाडल्याने शिंदेसेना वादाच्या भोवऱ्यात!
महाराष्ट्र
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- धुळे: तांत्रिक चुकीचा फटका! धुळ्यातील पिंप्री येथे लाखों रुपये खर्चून उभारलेला रेल्वे पूल पाडण्याची वेळ; आता त्याच ठिकाणी नवीन अंडरपासचे काम सुरू!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना


























Subscribe to my channel



