रश्मी बन्सल यांचा कॉलम:जर तुमचे ‘चारित्र्य’ चांगले असेल तर बाहेरचा धोका कमी

कल्पना करा की, जगापासून दूर डोंगरावर एक माणूस एका‎पायावर उभा राहून तपश्चर्या करत आहे. त्याची शक्ती‎वाढत चालली आहे, आता त्याला कुणीही रोखू शकत नाही‎असे वाटते. अशातच त्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी एक‎अप्सरा येते. अनेक दिवस तो तपस्वी अजिबात विचलित‎होत नाही, पण एके दिवशी त्याचे मन मोहाला बळी पडते.‎तो हळूच एक डोळा उघडतो आणि बस, अप्सरेचा बाण‎थेट निशाण्यावर लागतो. वर्षानुवर्षांची तपश्चर्या वाया जाते‎आणि तो तपस्वी पुन्हा एक सामान्य माणूस बनतो.‎ ही कोणतीही पौराणिक कथा नाही. नुकतेच अमेरिकेतील‎सर्वात शक्तिशाली कंपनीच्या मालकासोबत नेमके हेच‎घडले आहे. तुम्ही म्हणाल, ते कोणत्या डोंगरावर चढून‎तपश्चर्या करत होते? तर माझे असे मानणे आहे की,‎स्वतःचे स्टार्टअप सुरू करणे ही एक प्रकारची तपश्चर्याच‎आहे. जग एका वाटेवर असते, तर तुम्ही वेगळ्याच वाटेवर‎असता. माणसाच्या डोक्यावर इतक्या जबाबदाऱ्या असतात‎की, त्या बॅलन्स करणे म्हणजे एका पायावर उभे‎राहिल्यासारखेच वाटते. खूप संघर्ष करावा लागतो; जगाशी‎आणि स्वतःशीही, तेव्हा कुठे यश मिळते. आणि मग येते‎मोहित करणारी अप्सरा!‎ 33 वर्षांच्या तपश्चर्येतून जेन्सेन हुआंग यांनी एक अशी‎कंपनी उभी केली, जिच्या जोरावर संपूर्ण एआय क्रांती‎टिकून आहे. पण कदाचित ते हे विसरले की, ज्याला देव‎शक्तीचे वरदान देतो, त्याच्यासमोर एक अप्सराही प्रकट‎होते! जेन्सेन यांचा पाय घसरला आणि त्यांचे जगच बदलून‎गेले. कंपनी हातातून गेली आणि प्रतिष्ठाही. लोक त्यांच्याच‎एआयचा वापर करून, मीम्स बनवून त्यांचीच खिल्ली‎उडवत आहेत! माणसाने तोंड तरी कुठे लपवावे? असो, माझ्या सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, कुणी कितीही‎श्रीमंत असो किंवा शक्तिशाली असो, पण सृष्टीचा नियम‎आहे - त्याचीही परीक्षा होतेच! तपश्चर्येत मग्न राहायचे की‎डोळे उघडायचे, हा निर्णय तो स्वतः घेतो. डोळे‎उघडल्यानंतरही, जे आपल्याला मोहात पाडत आहे त्याकडे‎दुर्लक्ष करण्याची संधी त्याच्याकडे असते. आंतरिक शक्ती‎यालाच म्हणतात.‎ पण एकदा का पाय घसरला, तर मग तुम्ही बाहेरच्या जगाला‎कितीही फसवण्याचा प्रयत्न करा, ती शक्ती आता‎तुमच्याकडे राहिलेली नसते. जेन्सेन यांच्या कथेत एक‎नाही, तर अनेक ‘अप्सरा’ समोर आल्या आहेत. पण मोहात‎पाडणारी व्यक्ती ही कुणी जिवंत, सुंदर स्त्रीच असेल असे‎नाही. मनाचे अनेक मोह असतात, पैशाची अनेक प्रलोभने‎असतात. ही सर्व ‘अप्सरेची’च रूपे आहेत; म्हणजेच‎तपश्चर्या भंग करणारी साधने.‎ तुम्ही म्हणाल, मी तर तसाही सामान्य माणूस आहे, माझा या‎सगळ्याशी काय संबंध? तर मी म्हणेन की, या पृथ्वीवर जो‎कुणी मनुष्यरूपात जन्माला आला आहे, तो इथे तप‎करण्यासाठीच आला आहे. सुरक्षित राहायचे असेल, तर‎तुम्हालाही योग्य निवड करावीच लागेल. अप्सरा येते,‎मनाला भुरळ घालते. फोन पुन्हा पिंग होतो, तुमचा‎एकाग्रतेचा भंग होतो. लग्नानंतर डेटिंग करताय, जगाच्या‎नजरेला घाबरताय. बँक बॅलन्सपेक्षा मोठे असते कॅरेक्टर.‎ पुराणांमध्ये म्हटले आहे की, कठोर तपश्चर्या ही‎देवलोकासाठी समस्या बनत असे. देवलोक डळमळीत‎व्हायचा, इंद्रदेव अस्वस्थ व्हायचे. आजही कुणाची प्रगती‎पाहून लोक हादरतात आणि त्याला पडताना पाहून‎सुखावतात. पण लक्षात ठेवा, बाहेरचा धोका कमी आहे,‎जर तुमच्या कॅरेक्टरमध्ये दम आहे!अप्सरा येईल, तिला‎अजिबात भाव देऊ नका. आपल्या जवळही येऊ देऊ नका.‎(हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *