पं. विजयशंकर मेहता यांचा स्तंभ:गुन्ह्यांविरुद्ध समाजानेही ‎आपली भूमिका बजावावी

एक काळ असा होता की समाजाच्या सामूहिक शक्तीला खूप महत्त्व ‎होते. काही गुन्हे तर याच कारणामुळे नियंत्रणात राहत असत. नातेवाईक, ‎ओळखीच्या माणसांच्या नजरेची लोकांना भीती व मर्यादा असायची. ‎आता ती लाज वाटणे संपले. नव्या वयाची मुले वस्त्यांत गाड्यांच्या काचा ‎फोडतात, उघडपणे शस्त्रांचा वापर करत आहेत, गाड्यांवर स्टंट करत ‎आहेत. ओळखीतले पाहत आहेत, हे भयच त्यांच्या मनात उरले नाही. पूर्वी ‎आसपास जर कोणी ओळखीचे असेल तर एक भीती असायची. ही मर्यादा ‎सर्वात आधी कंस, दुर्योधनाने तोडली होती. या दोघांनी मोठे-वडीलधारे, ‎ओळखीच्या लोकांची मर्यादा भंग केली. समाजाची सामूहिक शक्ती जेव्हा ‎संपू लागते, तेव्हा सोशल पोलिसिंगमध्ये प्राण फुंकावेच लागतील. ही ‎आकडेवारीही भीतीदायक आहे की भारतात 10 लाख लोकांमागे साधारण ‎150 पोलिस आहेत, त्यातीलही निम्मे तर गैर-पोलिस कामात आहेत. ‎यामुळेही गुन्हेगार निर्धास्त होतात. गुन्ह्यांविरुद्ध समाजाने, कुटुंबाने भूमिका ‎बजावावीच लागेल. समाजातून लाज गेली तर बेशिस्त आली नाही, ‎गुन्हेगारी आली.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *