
Ahilyanagar : अहिल्यानगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावर कोळगाव शिवारातील माऊली मंदिराजवळ आज मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील आई-वडील आणि मुलासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि इको कार यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात इको गाडीचा चालक नितीन अनिल कोकाटे (वय 22, रा. काष्टी) यांच्यासह गाडीत प्रवास करणारे गजानन जनार्धन पायघन (वय 47 ), दुर्पा गजानन पायघन (वय 36) आणि त्यांचा मुलगा वैभव गजानन पायघन (वय 19) यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, कुटुंबातील करण गजानन पायघन (वय 13) हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
पायघन कुटुंब मूळचे अकोले तालुक्यातील पातूर येथील मळतूर गावचे असून, कामानिमित्त ते सध्या श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथे वास्तव्यास होते. आज मंगळवारी पहाटे ते गावाकडून चिंभळेकडे येत असताना कोळगाव शिवारात दौंडकडून नगरकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या इको कारला समोरून जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. या दुर्घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
पती-पत्नीसह तरुण बेपत्ता
जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चांगतपुरी गावाजवळ काल रात्री एक भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट उजव्या कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत कारमधील पती-पत्नीसह त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला स्थानिक तरुण असे तिघेजण बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पोलिसांकडून शोधकार्य सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
कारमधील मुखीद शेख आणि निलोफर मुखीद शेख (रा. कोरडगाव, ता. शेवगाव) हे प्रवासी तर रावसाहेब खडेकर असं बचावकार्यासाठी पाण्यात उतरलेला स्थानिक बेपत्ता तरुणाचं नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल सोमवारी रात्री 11 ते 11:30च्या सुमारास अलताफ पठाण हे आपली स्विफ्ट कार एमएच 12 केजे 9032 घेऊन जात होते. कारमध्ये त्यांच्यासोबत मुखीद शेख आणि त्यांच्या पत्नी निलोफर मुखीद शेख हे प्रवास करत होते. चांगतपुरी गावाजवळील कालव्याच्या पुलाजवळ चालकाला रस्त्याचा अंदाज आल्यामुळे कार कालव्यात कोसळली.
शहर
- टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या! सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचा 'अनुदानित' विक्रीचा मोठा निर्णय
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
महाराष्ट्र
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
गुन्हा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
- लोहगड किल्ला हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा! केतन अग्रवालचा मृत्यू 'अपघात' नसून मंगेतर आणि तिच्या प्रियकराने केलेली सुनियोजित हत्या
- मुंबई: लोकलमध्ये प्रवाशावर जीवघेणा हल्ला; दरवाजा बंद करण्याच्या वादातून तरुणावर चाकूने वार!
- गोव्यातील आलिशान सोसायटीतून चालत होते सायबर फ्रॉडचे साम्राज्य; ६.२५ कोटींचे व्यवहार उघड, १२ जणांना बेड्या
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- स्कोडाची दमदार एन्ट्री! एका चार्जवर ६४७ किमी धावणार ७-सीटर लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही 'पीक' (Peaq) लाँच
- उत्तर प्रदेशात खळबळ! काकी गरोदर राहिली अल्पवयीन पुतण्यामुळे; नात्याला काळीमा फासणाऱ्या प्रकरणामुळे गाव हादरले!
- प्रवाशांसाठी मोठा दिलासा! हायवेवर आता मिळणार गाडी दुरुस्ती आणि पंचरची सुविधा; NHAI चा महत्त्वाचा निर्णय
- टेलिग्रामवरील बंदी अखेर उठली; मात्र 'मेसेज एडिटिंग' फिचर ३० जूनपर्यंत बंदच राहणार
























Subscribe to my channel





Unlock top-tier commissions—become our affiliate partner now!