भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय: १ जानेवारीपासून १८ गाड्यांचा 'सुपरफास्ट' दर्जा रद्द, प्रवाशांचे तिकीट दर होणार कमी!

भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने १८ रेल्वे गाड्यांचा 'सुपरफास्ट' दर्जा काढून त्यांना 'नॉन-सुपरफास्ट' म्हणजेच साधारण एक्स्प्रेसचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे-मुंबईदरम्यान धावणारी अत्यंत लोकप्रिय असणारी 'प्रगती एक्स्प्रेस' (Pragati Express) तसेच 'पुणे-काझीपेठ एक्स्प्रेस' या प्रमुख गाड्यांचाही समावेश आहे. रेल्वे बोर्डाच्या कडक निकषांनुसार या गाड्यांचा सरासरी वेग तास ५५ किलोमीटर प्रतितास यापेक्षा कमी भरल्यामुळे हा बदल करण्यात आला असून, हा नवीन बदल आगामी १ जानेवारी २०२७ पासून देशभरात आणि संबंधित मार्गांवर लागू होणार आहे.

वेग कमी भरल्याने सुपरफास्ट दर्जा काढला:भारतीय रेल्वेच्या नियमानुसार कोणत्याही ट्रेनला 'सुपरफास्ट' श्रेणीत कायम ठेवण्यासाठी तिचा सरासरी वेग किमान ५५ किलोमीटर प्रतितास असणे बंधनकारक असते. मात्र, नियमित आढावा घेतल्यानंतर मध्य रेल्वे मार्गावरील या १८ गाड्या निर्धारित वेगाचे निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरल्या. त्यामुळे या गाड्यांना आता सुपरफास्ट श्रेणीतून वगळून नियमित एक्स्प्रेस गाड्या म्हणून चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

प्रवाशांच्या तिकीट दरात होणार कपात: या बदलामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. सुपरफास्ट गाड्यांच्या तिकीटांवर आकारले जाणारे अतिरिक्त 'सुपरफास्ट सरचार्ज' (अधिभार) शुल्क आता रद्द केले जाणार आहे. यामुळे १ जानेवारी २०२७ पासून या गाड्यांमधून प्रवास करताना प्रवाशांना कमी तिकीट दर मोजावे लागतील:

  • स्लीपर क्लास (Sleeper Class): तिकीट दरात ३० रुपयांची कपात.

  • तिसरा एसी (3AC), 3AC इकॉनॉमी, दुसरा एसी (2AC) आणि एसी चेअर कार: तिकीट दरात ४५ रुपयांची कपात.

  • पहिला एसी (1AC) आणि एक्झिक्युटिव्ह क्लास: तिकीट दरात ७५ रुपयांची कपात.

गाड्यांच्या क्रमांकांतही होणार बदल: सुपरफास्ट दर्जा काढून घेतल्यामुळे या १८ गाड्यांचे जुने नंबर बदलून त्यांना नवीन एक्सप्रेस श्रेणीचे क्रमांक दिले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी आगामी काळात प्रवासाचे नियोजन करताना किंवा रेल्वे तिकीट बुक करताना रेल्वेच्या सुधारित वेळापत्रकाची आणि नवीन ट्रेन नंबरची खात्री करून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *