कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या राजकारणात सध्या सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावरून भारतीय जनता पक्षावर अत्यंत तिखट शब्दात हल्लाबोल केला आहे. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव टाळण्यासाठी आणि आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर राज ठाकरेंनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. "भारतीय जनता पक्षाने आता रडीचा डाव खेळणं बंद करायला हवं," असे थेट आव्हान त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे.
काय म्हणाले राज ठाकरे आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये? दिवाळीच्या आणि सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "गोकुळ दूध संघामध्ये तुम्हाला हवी तशी सत्ता मिळवता आली नाही म्हणून तुम्ही लगेच तुमची सर्व तत्त्वे आणि नियम बाजूला ठेवणार आणि वर 'लोकशाही वाचवा' म्हणून मोर्चे काढणार, हास्यास्पद आहे."
राज ठाकरेंनी भाजपच्या भूमिकेवर उपरोधिक टोला लगावत पुढे म्हटले की, "सध्या महाराष्ट्रात एका बाजूला पाण्याचा भीषण दुष्काळ पडला आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षात 'समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ' एकाच वेळी कसा पाहायला मिळत आहे, याचेच आश्चर्य वाटते! सत्तेत असताना हेच लोक 'लोकशाही वाचवा' म्हणून मोर्चे काढतात आणि प्रत्यक्षात मात्र स्वतःच लोकशाहीचा गळा आवळण्याचे काम करतात."
देशातील स्थिती आणि भाजपवर ताशेरे: राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये केवळ गोकुळपुरտच नव्हे तर इतर मुद्द्यांवरही भाजपला धारेवर धरले. ते म्हणाले की, "यांच्याच काळात देशात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले, अतिरेकी हल्ले झाले तरी 'दहशतवादापासून देश वाचवा' म्हणून हेच मोर्चे काढतात. देशाची अर्थव्यवस्था खालावली की 'अर्थव्यवस्था वाचवा' म्हणून मोर्चे काढतात. भारतीय जनता पक्ष हा जगातील एकमेव असा अजब पक्ष असेल, जो तळापासून वरपर्यंत सर्वत्र सत्तेत असूनही स्वतःच 'लोकशाही वाचवा' म्हणून मोर्चे काढत आहे."
विरोधी पक्षांच्या बहुमताचा करा सन्मान:गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागांवर विरोधी व समविचारी पॅनेलने बहुमत मिळवले आहे, तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, "कुठल्या का मार्गाने आणि पद्धीने तुम्ही यापूर्वी बहुमत मिळवले होते, ते सर्व विरोधी पक्षांनी तब्बल १२ वर्षे निमूटपणे सहन केले. मग आता जर या देशातील आणि राज्यातील सामान्य जनतेचा कल किंवा कौल विरोधी पक्षांकडे झुकायला लागला आहे, तर त्या जनाधाराचा आणि निकालाचा स्वीकार करायला व तो सन्मानाने सहन करायला भाजपाने देखील शिकलं पाहिजे!"
गोकुळमधील शासननियुक्त सदस्यांच्या माध्यमातून सत्ता बदलवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मनसेप्रमुखांनी कडाडून विरोध दर्शवल्यामुळे आता या राजकीय वादात आणखी रंग भरले असून, यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




