सातारा: आठवड्याच्या सुरुवातीलाच साताऱ्यातून एक अत्यंत खळबळजनक आणि गंभीर बातमी समोर आली आहे. सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाची (Satara District and Sessions Court) इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा एक ई-मेल न्यायालयाच्या अधिकृत ईमेलवर प्राप्त झाला. या अचानक आलेल्या धमकीमुळे संपूर्ण न्यायालय परिसर, पोलीस प्रशासनासह जिल्हाभरात काही काळ एकच घबराट उडाली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात ईमेल धारकाविरोधात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून, धमकीमागील सत्यता शोधण्यासाठी आणि आरोपीची ओळख पटवण्यासाठी सायबर सेल व पोलिसांकडून युद्धपातळीवर तपास सुरू आहे.
काय घडली नेमकी घटना? सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे न्यायालयाचे कामकाज सुरू होण्याच्या सुमारास न्यायालयाच्या अधिकृत मेल आयडीवर एक धमकीचा संदेश आला. यामध्ये सातारासह राज्यातील काही प्रमुख न्यायालयांच्या इमारती बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. हा मेल पाहताच न्यायालयीन प्रशासनाचे धाबे दणाणले आणि त्यांनी तातडीने याची माहिती सातारा पोलीस दलाला दिली.
माहिती मिळताच सातारा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, मोठा पोलीस फौजफाटा, श्वानपथक (Dog Squad) आणि बॉम्ब शोधक-नाशक पथक (BDDS) तातडीने जिल्हा न्यायालय परिसरात दाखल झाले. सुरक्षा खबरदारीचा उपाय म्हणून मानक कार्यपद्धतीनुसार (SOP) तातडीने संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला. न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि न्यायालयात कामानिमित्त आलेले शेकडो पक्षकार यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बीडीएस व श्वानपथकाने संपूर्ण इमारतीचा कोपरा नन्कोपरा तपासला, मात्र तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. हा एक निव्वळ अफवा किंवा बनावट धमकीचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस व प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला.
सायबर सेलकडून तांत्रिक तपास सुरू: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ई-मेल नेमका कुठून आणि कोणाच्या माध्यमातून पाठवण्यात आला, याचा सखोल तांत्रिक शोध सध्या घेतला जात आहे. प्राथमिक तपासात हा मेल परदेशातून किंवा अन्य ठिकाणाहून व्हर्च्युअल प्रॉक्सी किंवा बनावट आयपी ॲड्रेसचा वापर करून पाठवण्यात आला असावा, असा संशय वर्तवला जात आहे. ई-मेलचे आयपी ॲड्रेस (IP Address) आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सायबर सेलचे पथक आरोपीचा कसून शोध घेत आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरवून समाजात आणि न्यायव्यवस्थांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना कठोर कायदेशीर शिक्षा केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




