दिवाळीच्या गर्दीत पुणे रेल्वे स्थानकावर हायटेक सुरक्षा छत्र! १७० आधुनिक सीसीटीव्हींची २४ तास नजर, यार्डात नाईट-व्हिजन ड्रोनची गस्त

दिवाळी आणि आगामी सणासुदीच्या काळात पुणे रेल्वे स्थानकावरून (Pune Railway Station) आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी होत आहे. दररोज सुमारे १.५ ते २ लाखांहून अधिक प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या या स्थानकावर कोणतीही अनुचित घटना घडू नये, गर्दीचे योग्य व्यवस्थापन व्हावे आणि गुन्हेगारीवर चाप बसावा यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने आणि रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) स्थानकावर हायटेक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

१७० आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि नाईट-व्हिजन ड्रोन गस्त:

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि स्थानकावरील गर्दीवर चोवीस तास बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण स्थानक परिसरात १७० आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे आरपीएफच्या मुख्य नियंत्रण कक्षातून (Control Room) व्यासपीठ (Platform), तिकीट खिडकी, पादचारी पूल आणि मुख्य प्रवेशद्वारांवर २४ तास निगराणी ठेवली जात आहे.

याशिवाय, रात्रीच्या वेळी किंवा मोकळ्या रेल्वे यार्डात होणाऱ्या चोरीच्या घटना, चालत्या ट्रेनवर दगडफेक करणे, अनधिकृतपणे ट्रॅक ओलांडणे आणि रेल्वे मालमत्तेची नासधूस रोखण्यासाठी 'नाईट-व्हिजन' (Night-Vision) क्षमतेने सज्ज असणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्यांचा (Drones) प्रभावी वापर केला जात आहे. यार्ड परिसरावर ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जात असून, संशयास्पद हालचाल दिसताच नियंत्रण कक्षाला तातडीने अलर्ट मिळण्याची सोय करण्यात आली आहे.

प्रवेशद्वारांवर १७ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर्स आणि बॅगेज स्कॅनर:

सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी स्थानकावरील प्रवेश अधिक सुरक्षित करण्यात आला आहे. प्रवाशांचे सामान तपासण्यासाठी मोठ्या क्षमतेचे अद्ययावत बॅगेज स्कॅनर (Baggage Scanners) बसवण्यात आले असून, मुख्य प्रवेशद्वारांवर तब्बल १७ 'डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर्स' (DFMD) तैनात करण्यात आले आहेत.

पुणे विभागाच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त (RPF) प्रियंका शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सणानिमित्त फ्लॅटफॉर्मवर आणि यार्डात अतिरिक्त सुरक्षा कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. fixed सीसीटीव्ही नेटवर्क, प्रत्यक्ष सुरक्षा तपासणी, मोबाईल पेट्रोलिंग आणि ड्रोन गस्त यांच्या समन्वयातून प्रवाशांचा प्रवास निर्भय आणि सुरक्षित करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *