पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:पुरुषांना हक्क हवे असल्यास‎ घरकामात हातभार लावावा

पती-पत्नीच्या नात्यातील बारकावे ते दोघेच सर्वोत्तम समजू शकतात.‎पण कधीकधी इतर नातेवाईक, मित्र, कायदा आणि सरकारलाही यात‎हस्तक्षेप करावा लागतो. पत्नी म्हणते, तू मला राणीसारखे ठेव. मी तुला‎राजा बनवेन. या संवादाचा अर्थ खूप खोल आहे. तर पती म्हणतो,‎संपूर्ण बागेलाही आश्चर्य वाटते की, आम्ही या बागेतील सर्वात सुंदर‎फूल निवडून आणले. या संवादातही वेगळा अर्थ दडला आहे.‎लग्नानंतरची काही वर्षे हे संवाद गोडी आणि सुगंध टिकवून ठेवतात.‎पण हळूहळू पुढे सगळे कंटाळवाणे,ओझे वाटू लागते. वास्तविक‎पाहता सह-जबाबदारीच्या आयुष्यालाच ‘दांपत्य'' म्हणतात. पण चूक‎नेमकी इथेच होत आहे. परदेशात तर आता सरकार असे अ‍ॅप आणत‎आहे. पुरुष घरातील कामांत पत्नीला किती मदत करतात याचा निर्णय ते‎ॲप करेल. स्पेनने यावर कामही सुरू केले आहे. आजही जगात केवळ‎१५% पुरुषच घरातील कामे करतात. बाकी सर्व जबाबदारी स्त्रियांनाच‎उचलावी लागते. त्यांचे अर्धे आयुष्य विनावेतन घरकामे करण्यातच‎निघून जाते. म्हणूनच पुरुषांना हक्क हवे अस‎ल्यास त्यांनी घरकामांत‎हातभारही लावला पाहिजे.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *