सातारा: जिल्ह्यामधील फलटण-लोणंद पालखी महामार्गावर एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि काळीज पिळमून टाकणारी दुर्घटना घडली आहे. निंभोरे गावच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपाजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात अवघ्या २० वर्षीय तरुणाचा जागीच व उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे सातारा आणि पुणे जिल्ह्यातील संबंधित गावात तीव्र शोककळा पसरली असून, नियतीने या कुटुंबावर अवघ्या अडीच महिन्यांत दुसरा मोठा आघात केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
रविवारी (दि. २५) रात्री आठ ते नऊच्या दरम्यान हा अपघात झाला. अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी सुवर्णदीप याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यातच तरुण मुलाचाही मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत तरूणाची ओळख सुवर्णदीप सुरेश जगताप (वय २०, रा. रांझे, ता. भोर, जि. पुणे) अशी पटली आहे, तर या अपघातात त्याचा मित्र रोहित रवींद्र घोगरे (रा. रांझे, ता. भोर) हा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सुवर्णदीप आणि त्याचा मित्र रोहित हे दोघे आपल्या दुचाकीवरून विडणी येथून आपल्या रांझे गावी परत चालले होते. दरम्यान, फलटण-लोणंद पालखी महामार्गावर निंभोरे गावच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपासमोर आले असता, त्यांची दुचाकी उसाने भरलेल्या एका ट्रॅक्टरला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तरुणांपैकी सुवर्णदीप याच्या पायावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर ट्रॅक्टरचालक आपले वाहन घटनास्थळावरच सोडून पळून गेला.
स्थानिक नागरिक व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींना उपचारासाठी हलवले. गंभीर जखमी झालेल्या सुवर्णदीप याला पुढील उपचारासाठी बारामती येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याचा जखमी मित्र रोहित घोगरे याच्यावर खेड-शिवापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मृत सुवर्णदीपच्या कुटुंबावर प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळला आहे; कारण अवघ्या अडीच महिन्यांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच तरुण मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने घरातील एकमेव आधार हरपल्याची भावना व्यक्त होत असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. फलटण ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.
शहर
- पुणे: रिंगरोड'ला अजित पवारांचे नाव देण्याच्या मागणीवरून रोहित पवारांनी राज्य सरकारची केली कोंडी; पुण्यतिथीला आंदोलनाचा इशारा
- छत्रपती संभाजीनगर: आधी जीआर, मगच माघार!; सुधारित वेतनश्रेणीसाठी राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर, कामकाज ठप्प
- मुंबई: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दालनाचं उद्घाटन कोण करणार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले, सत्ताधाऱ्यांना लगावला टोला
- मुंबई: लोकलमध्ये धक्कादायक थरार! दोन प्रवाशांच्या भांडणात फेकलेला चाकू घुसला तिसऱ्याच निष्पाप प्रवाशाच्या छातीत; अंधेरीतील घटना
महाराष्ट्र
- पुणे: भक्तीचा महासागर! प.पू. श्री शंकर महाराजांच्या प्रगटदिन सोहळ्याला उत्साहात सुरुवात, दिवसभर दर्शनासाठी उसळली अलोट गर्दी
- कोल्हापुर: केएसए फुटबॉल लीगचा महासंग्राम १ डिसेंबरपासून सुरू होणार; वेळापत्रक जाहीर, कधी अन् कोणत्या संघात रंगणार सामने?
- पुणे: रिंगरोड'ला अजित पवारांचे नाव देण्याच्या मागणीवरून रोहित पवारांनी राज्य सरकारची केली कोंडी; पुण्यतिथीला आंदोलनाचा इशारा
- छत्रपती संभाजीनगर: आधी जीआर, मगच माघार!; सुधारित वेतनश्रेणीसाठी राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर, कामकाज ठप्प
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना
- नवी दिल्ली: पाठिंब्याबाबत शरद पवार गटाच्या संकेतांमुळे NDAला मिळाले बळ; संसदेत १० ते १५ मते अधिक मिळण्याची शक्यता
- कर्नाटक: सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनाला निघालेल्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार!
- गोवा: महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यावर सरकारचा विशेष भर; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन


























Subscribe to my channel



