मुंबई: धडाकेबाज कारवाई करूनही आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर फार्मासिस्ट का झाले प्रचंड नाराज? समोर आले मोठे कारण!

मुंबई: अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तथा धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे आपल्या कठोर कार्यपद्धतीमुळे आणि भेसळखोरांविरोधात सुरू असलेल्या आक्रमक कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अत्यंत चर्चेत आहेत. त्यांच्या या कारवाईचे आणि धाडींचे कौतुक संपूर्ण देशभरात होत असून सामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठे क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे एका महत्त्वाच्या मुद्द्यावरून राज्यातील औषध विक्रेते आणि फार्मासिस्ट यांच्यामध्ये तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीबाबत मोठी नाराजी निर्माण झाली असून त्यांनी आपली उघड नाराजी जाहीर केली आहे.

ऑनालाईन औषध विक्री आणि ई-फॉर्मसीकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप:

फार्मासिस्टांच्या म्हणण्यानुसार, तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून मेडिकल दुकानांवर फार्मासिस्ट हजर नसल्यास थेट परवाना रद्द करण्याचे अत्यंत कडक आदेश जारी केले आहेत. स्थानिक पातळीवरील दुकानांवर कठोर नियम लागू केले जात असतानाच, दुसरीकडे राज्यभरात ई-फॉर्मसी (E-Pharmacy) आणि बेकायदेशीरपणे चालणारी ऑनलाईन औषध विक्री मोठ्या प्रमाणावर फोफावत आहे. तुकाराम मुंढे यांच्या डोळ्यांसमोर हा सर्व अवैध कारभार सुरू असतानाही अन्न आणि औषध प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आक्षेप फार्मासिस्ट संघटनांनी घेतला आहे.

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री आणि सुरक्षेचा प्रश्न:

ऑनलाईन पद्धतीने औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांवर आणि प्लॅटफॉर्म्सवर प्रशासनाचा कोणताही वचक उरलेला नाही, असा सवाल फार्मासिस्टांनी उपस्थित केला आहे. सामान्य मेडिकल दुकानदारांना सर्व कायदे आणि नियम काटेकोरपणे पाळावे लागतात, मग ऑनलाईन विक्री करणाऱ्यांना कोणतेही नियम लागू नाहीत का? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. ऑनलाईन माध्यमातून कोणतीही वैद्यकीय चिठ्ठी (Doctor's Prescription) नसताना सर्रास औषधे विकली जात आहेत. एवढेच नव्हे तर अल्पवयीन मुले देखील सहजपणे औषधे मागवू शकतात आणि गर्भपाताच्या गोळ्यांसारख्या संवेदनशील औषधांची देखील कुठलाही रेकॉर्ड न ठेवता मुक्तपणे विक्री केली जात आहे, ज्यामुळे या औषधांचा मोठा गैरवापर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नियम सर्वांसाठी समान असावेत:

तुकाराम मुंढे यांच्याकडून विविध आस्थापनांवर आणि महाप्रसादाच्या नियमांवर देखील कडक पावले उचलली जात आहेत, याचे स्वागत असतानाच औषध क्षेत्रातील कायदेशीर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व मध्यम विक्रेत्यांवर नियम लादले जात असताना ऑनलाईन बेकायदेशीर धंद्यांवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी फार्मासिस्टांकडून केली जात आहे. मागील अनेक दिवसांपासून औषध विक्रेत्यांकडून ऑनलाईन औषध विक्रीला तीव्र विरोध केला जात असून, आता या नाराजीवर तुकाराम मुंढे नेमकी काय भूमिका घेणार आणि काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण औषध क्षेत्राचे लक्ष लागले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *