ठाणे शहरात वेगाने सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेची बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित 'ठाणे कोस्टल रोड' (Thane Coastal Road) प्रकल्पाच्या मार्गाबाधित क्षेत्रातील तब्बल १,७३३ कांदळवणाच्या (Mangrove) झाडांवर कुऱ्हाड चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पामुळे एकूण १,७३३ खारफुटीची झाडे बाधित होणार असून, त्यापैकी तब्बल ६८० झाडे ही प्रकल्पाच्या बांधकामासाठी कायमस्वरूपी (Permanently Removed) नष्ट करावी लागणार आहेत. या निर्णयामुळे ठाण्यातील पर्यावरण रक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बाळकुम ते आनंदनगर यादरम्यान प्रस्तावित असलेल्या ठाणे कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील या प्रकल्पामुळे एकूण १२.७२ हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. या प्रकल्पाच्या मार्गामध्ये येणाऱ्या कांदळवनांच्या संवर्धनाबाबत आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाबाबत एमएमआरडीए (MMRDA) आणि पर्यावरण विभागाकडून सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामादरम्यान १,०५३ झाडे तात्पुरती कापावी लागणार आहेत, मात्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच किंवा इतर योग्य ठिकाणी नव्याने रोपांचे रोपण करून पुनर्रोपण करण्याची योजना आहे. तसेच, या प्रक्रियेत २,०२१ झाडे काही प्रमाणात बाधित होणार आहेत, परंतु ती पूर्णपणे तोडावी लागणार नाहीत.
प्रकल्पाची तांत्रिक वैशिष्ट्ये व खर्च:
-
प्रकल्पाचा प्रस्तावित मार्ग: बाळकुम ते आनंदनगर
-
प्रकल्पाची एकूण लांबी: ७.१२९ किलोमीटर
-
सीआरझेड (CRZ) क्षेत्रातून जाणारा मार्ग: ५ किलोमीटर
-
प्रकल्पाचा अंदाजे खर्च: ३,३६४ कोटी रुपये
-
कायमस्वरूपी बाधित कांदळवन क्षेत्र: १.७४ हेक्टर
-
तात्पुरते बाधित कांदळवन क्षेत्र: २.७ हेक्टर
पर्यावरणाची हानी शक्य तितकी कमी करण्यासाठी महानगरपालिका आणि प्राधिकरणाकडून उन्नत संरचना (Elevated Structures) तसेच खांबांमधील अंतर अधिक ठेवण्याची रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्र तज्ज्ञ मूल्यांकन समिती (MCZMA) यापूर्वीच या प्रकल्पाच्या मार्गात आवश्यकतेनुसार बदल सुचवले होते. त्यानंतर पर्यावरणविषयक सर्व कडक अटी व शर्तींच्या अधीन राहून हा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एकीकडे शहरांतर्गत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अशा महामार्ग व रस्ते प्रकल्पांची गरज भासत असली, तरी दुसरीकडे हजारो कांदळवरांची कत्तल होणार असल्यामुळे निसर्गप्रेमींनी आणि पर्यावरणवादी संघटनांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




