सातारा: लग्नाचा वाढदिवस असल्याने पत्नीसाठी सोन्याचा हार खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने दागिन्यांचे फोटो काढण्याच्या बहाण्याने १४ लाख रुपयांचे आठ तोळे दागिने घेऊन मित्रासोबत दुचाकीवरून पोबारा केला. पाठलाग करणा-या तरुणांच्या डोळ्यात चटणी टाकून चोरटे नवा रस्ता घाटमार्गे पसार झाले. ही थरारक घटना शुक्रवारी (दि. १५) दुपारी तीनच्या सुमारास ढेबेवाडी (ता. पाटण) येथे भरवस्तीतील मगर बंधू ज्वेलर्समध्ये घडली. याबाबत विनोद मगर यांनी ढेबेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ढेबेवाडी बाजारपेठेतील मध्यवस्तीत विनोद मगर यांचे मगर बंधू ज्वेलर्स आहे. शुक्रवारी दुपारी ते स्वतः, त्यांचा मुलगा विराज व दोन कामगार दुकानात होते. दुपारी तीनच्या सुमारास एक तरुण दुकानात दागिने घेण्याच्या बहाण्याने आला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीसाठी हार घ्यायचा असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार दुकानातील कामगार त्याला दागिने दाखवत होता. त्याचवेळी तो व्हिडिओ कॉलवरून कोणालातरी दागिने दाखवत होता.
विराज मगर हा त्याला दागिने दाखवून कागदावर आकडेमोड करत असतानाच चोरटा तीन दागिने घेऊन पळत सुटला. दुकानाबाहेर काही अंतरावर थांबलेल्या दुचाकीस्वारासोबत तो भरधाव वेगाने निघून गेला. चोरीचा प्रकार लक्षात येताच गोरख मोहिते आणि इतर तरुणांनी चोरट्यांचा दुचाकीवरून पाठलाग केला. मात्र, घाटमार्गात पाठलाग करणा-या तरुणांच्या डोळ्यात चटणी टाकून चोरट्यांनी धूम ठोकली.
या घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच अन्य पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. भरदिवसा बाजारपेठेत घडलेल्या धाडशी चोरीच्या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पत्नीसाठी हार घेण्यासाठी आले
चोरट्याने आपण ढेबेवाडी परिसरातील जिंती-सावंतवाडीचा असल्याचे, तसेच माजी सैनिक असल्याचे सांगितले. आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. पत्नीसाठी हार खरेदी करायचा आहे, असे सांगून दागिन्यांच्या फोटो काढण्याच्या बहाणा करून त्याने पोबारा केला.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: पुणे-बंगळुरू महामार्गावर कवठे हद्दीत धाडसी दरोडा! कुरिअर व्हॅन अडवून चालक-क्लिनरला शस्त्राचा धाक; १ कोटी ११ लाखांचा ऐवज लुटला!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




