महाराष्ट्र: राजकारणात आणि राज्य मंत्रिमंडळात दसऱ्यानंतर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षातील मंत्र्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचा आढावा घेऊन मंत्रिमंडळात मोठी 'भाकरी फिरवण्याच्या' तयारीत आहेत. ज्या मंत्र्यांची कामगिरी सुमार राहिली आहे किंवा जे मंत्री पक्षात निष्क्रिय ठरले आहेत, अशा २ ते ४ अकार्यक्षम मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन त्यांच्या जागी पक्षातील तरुण आणि आक्रमक आमदारांना संधी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू आणि तरुण चेहऱ्यांना संधी
शिवसेनेतील वरिष्ठ राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध निवडणुका आणि पक्षसंघटनेच्या विस्तारात ज्या मंत्र्यांनी अपेक्षित कामगिरी केली नाही, अशा मंत्र्यांबाबत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पक्षाचे संघटन तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मंत्रिमंडळात तरुण व अभ्यासू आमदारांचा समावेश करणे आवश्यक मानले जात आहे. त्यामुळे अकार्यक्षम मंत्र्यांची गच्छंती करून त्यांना केवळ संघटनेच्या कामात व्यस्त ठेवले जाईल आणि त्यांच्या जागी नव्या, तरुण आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
पक्षांतर्गत आढावा आणि आगामी रणनीती
एकनाथ शिंदे यांनी पक्षातील प्रत्येक मंत्र्याच्या कामाचा, त्यांच्या क्षेत्रातील जनसंपर्काचा आणि पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा अहवाल मागवला आहे. दसऱ्याच्या मेळाव्यानंतर किंवा दिवाळीच्या आधी हा मंत्रिमंडळ फेरबदल (Cabinet Reshuffle) घडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या फेरबदलामुळे शिवसेनेतील अनेक इच्छुक आणि तरुण आमदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, नेमक्या कोणत्या मंत्र्यांचे पद धोक्यात येणार आणि कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात लाल दिवा मिळणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
शहर
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीतही मोठी जबाबदारी; कोणताही निधी मिळणार नाही, पण विशेष शालेय स्वच्छता मोहीम राबविण्याचे शासनाचे निर्देश!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- सातारा: किल्ले प्रतापगडावर ३६७ मशालींचा भव्य 'मशाल महोत्सव'; ३६७ व्या वर्षपूर्तीनिमित्त गड उजळणार तेजोमय प्रकाशात!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!



























Subscribe to my channel




