महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. राज्य सरकारने या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची बहुप्रतिक्षित तिसरी यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे. या तिसऱ्या टप्प्यातील यादीत राज्यातील तब्बल ३ लाख ५१ हजार १९२ पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ऐन सणासुदीच्या व दुष्काळी परिस्थितीच्या काळात शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो बळीराजाला आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत बँकांकडून वितरित करण्यात आलेले आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत राहिलेले, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत पुनर्गठित किंवा फेरपुनर्गठित झालेले २ लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदत पीककर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे. शासनाने १ एप्रिल २०२६ पासूनचे पुढील व्याज व इतर खर्चही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीयीकृत व व्यावसायिक बँकांच्या यादीतील ज्या शेतकऱ्यांची थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी शासनाच्या विशेष 'हेअर कट' (Hair Cut) धोरणानुसार संबंधित कर्जे पूर्णपणे निरंक करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे.
या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ही अत्यंत पारदर्शकपणे ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे केली जात असून, यासाठी राज्य शासनाने 'महाआयटी'ची (MahaIT) नियुक्ती केली आहे. यादीत नाव असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज थकबाकीची माहिती तपासून तात्काळ जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्रात' (CSC) जाऊन आपले आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन सहकार विभागाकडून करण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक कर्ज खात्यावर जमा केली जाणार आहे.
शासनाने या योजनेत अत्यंत संवेदनशील निर्णय घेत, पात्र लाभार्थी शेतकरी दुर्दैवाने मयत झालेला असल्यास त्यांच्या कायदेशीर वारसांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी मानक कार्यप्रणाली (SOP) लागू केली आहे. तसेच, वयस्कर नागरिक किंवा ज्यांच्या हाताच्या बोटांच्या ठशांचे (Biometrics) प्रमाणीकरण होत नाही, अशा लाभार्थ्यांसाठी विशेष बायोमेट्रिक/ओटीपी पर्यायांची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून एकही पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
- महाराष्ट्र: शरद पवार गटाला खिंडार! तीन आजी-माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश!
- गोवा: नरकासूर प्रथेवर मंत्री सुदिन ढवळीकरांची आक्रमक भूमिका; राजकारणातील नरकासूर आधी बाजूला करा!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!
- नवी दिल्ली: "मी सर्वोच्च न्यायालयाची दहादा माफी मागतो..."सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर खासदार संजय राऊतांनी मागितली माफी!



























Subscribe to my channel




