दशकांपूर्वी रेल्वेचा प्रवास हा आठवणींच्या दुनियेत घेऊन जाणारा एक संथ आणि जादुई प्रवास असायचा. आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात या प्रवासाची अनमोल आठवण जपलेली आहे. खिडकीजवळ बसणे, हातात आवडते कॉमिक्स घट्ट पकडणे आणि बोटे खराब होऊ नयेत याची काळजी घेत आईने प्रेमाने भरवलेला घराचा डबा खाणे. आपण तासन्तास बाहेर पाहत राहायचो. नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले विशाल डोंगर आणि हिरवळ आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकायची. त्या काळात जग एका सुंदर लयीत चालायचे. लोखंडी रुळांवरून जाणारा तो एकसारखा व दिलासा देणारा आवाज एखाद्या गतिमान, लयबद्ध धडधडीसारखा वाटायचा. पुढे बंदिस्त एसी डबे आले, तेव्हा हाच आवाज अधिक शांत व मधुर झाला. ती एक शांत व आश्चर्ययुक्त सामायिक जागा होती. तेथे प्रवासी स्वप्नांत हरवून जाऊ शकत होते. वाचन करू शकत होते किंवा फक्त बाहेरच्या नयनरम्य नजाऱ्यांमध्ये हरवून जाऊ शकत होते. मात्र आज हे शांत वातावरण स्मार्टफोनच्या स्पीकर्सचा मोठा आवाज, जोरात चालणारे फोन कॉल्स आणि अनम्यूट केलेल्या व्हिडिओंच्या गोंगाटामुळे विस्कळीत होत चालले आहे. त्यातही आधुनिक, बंदिस्त एअर-कंडिशन्ड डबे आणि वंदे भारत एक्स्प्रेससारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये ही समस्या अधिक गंभीर बनली . हे डबे रुळांचा आवाज रोखण्यासाठी चांगल्या प्रकारे इन्सुलेट केलेले असतात. त्यामुळे त्यांचा आतील भाग हा पारंपरिक स्लीपर क्लासच्या तुलनेत शांत असतो. पण दुर्दैव असे की, याच शांततेमुळे प्रत्येक डिजिटल रिंगटोन, सोशल मीडिया रील आणि लहान मुलांच्या कार्टूनचा मोठा आवाज प्रचंड त्रासदायक वाटू लागतो. विशेषत: रात्रीच्या प्रवासात प्रवासी झोपण्याचा प्रयत्न करत असतात. आजकाल एकाच डब्यात अनेक जण मोबाइल स्पीकरवर चालवणे ही एक सामान्य बाब झाली आहे. दुसऱ्या बाजूला, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठे बदल होणार आहेत. शेती क्षेत्रातील घसरणीमुळे हळूहळू मजूर ग्रामीण भागातून एकात्मिक श्रम बाजाराकडे स्थलांतरित होतील. अशा स्थितीत 2030 पर्यंत शहरी लोकसंख्या सध्याच्या सुमारे 30 कोटींवरून वाढून 59 कोटी होण्याचा अंदाज आहे. काम करणाऱ्या वयोगटातील लोकसंख्येत 27 कोटींची भर पडेल व 70% नवीन रोजगार शहरांत निर्माण होतील. या शहरांत घरे महाग असल्याने अनेक लोक रोजच्या प्रवासासाठी हाय-स्पीड इंटरसिटी गाड्यांचा वापर करतील. रेल्वे हळूहळू सुरू करत आहे. 2030 पर्यंत मध्यमवर्गीय कुटुंबे सुमारे 9.5 कोटींवरून 16 कोटींपर्यंत पोहोचू शकतात. भारतात दहा लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्येच्या शहरांची संख्या वाढून 68 होण्याचा अंदाज आहे; तर संपूर्ण युरोपात अशा शहरांची संख्या 35 आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एकूण संख्याही 2008 मधील 283.5 कोटींवरून पुढील वर्षापर्यंत 718.9 कोटींवर पोहोचेल. याच कारणासाठी ही सामूहिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी भारतासह जगभरातील रेल्वे नेटवर्क गोंगाटविरोधी नियम लागू करत आहेत. अमेरिकेची ‘अमट्रॅक’ आणि जर्मनीच्या ‘आयसीई’ गाड्यांमध्ये वाचनालयासारखे शांत डबे असतात. तेथे कडक नियम लागू असतात. तर जपानच्या ‘शिंकानसेन’ मध्ये बाय-डिफॉल्ट संपूर्ण ट्रेनच शांत क्षेत्र मानली जाते. तेथे ध्वनी शिष्टाचार हा आता एक कायदेशीर दर्जा बनत चालला आहे. या जागतिक ट्रेंडचे अनुसरण करत भारतीय रेल्वेने जन विश्वास कायद्या अंतर्गत नवीन कडक दंडात्मक नियम लागू केले. स्पीकर मोडवर संगीत किंवा व्हिडिओ चालवणाऱ्या लहान मुलांना हेडफोनशिवाय मोठ्या आवाजात कार्टून दाखवणाऱ्या किंवा रात्री मोठ्या आवाजात कॉल करणाऱ्या प्रवाशांवर घटनास्थळीच 1,000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. त्यांना ट्रेनमधून उतरवले जाऊ शकते. नियमांचे सतत उल्लंघन केल्यास 5,000 रुपयांपर्यंतचा दंड व सहा महिन्यांपर्यंतचा कारावास होऊ शकतो. जगभरात प्रवासी ध्वनी शिष्टाचाराला नागरी कर्तव्य मानतात. जपानप्रमाणे आपल्याकडे कोणत्याही ट्रेनमध्ये बाय-डिफॉल्ट ‘क्वाएट प्रोटोकॉल’ नसल्यामुळे आपण किमान हेडफोन वापरू शकतो आणि आवाज लहान ठेवू शकतो, जेणेकरून इतरांसाठी रेल्वेचा प्रवास शांत आणि सुंदर राहील. फंडा असा की जगभरातील रेल्वे नेटवर्क सध्या स्मार्टफोनच्या मोठ्या आवाजाच्या समस्येशी झुंजत आहे. अशा वेळी भारतीय रेल्वे प्रवासी म्हणून रेल्वे प्रवासाची शांतता परत मिळवून देण्यासाठी आपण किमान काही प्रयत्न किंवा प्रयोग नक्कीच करू शकतो. आपल्या देशातील अनेक लोकांसाठी हा आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव असू शकतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
महाराष्ट्र
- नांदेड: हळदीने गाठला विक्रमी उच्चांक! बाजार समितीत भाव थेट २२ हजार २०० रुपयांवर; वर्षांनंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "मी सर्वोच्च न्यायालयाची दहादा माफी मागतो..."सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर खासदार संजय राऊतांनी मागितली माफी!
- उत्तर प्रदेश: भाजपाचा सपाला मोठा धक्का; तीन बक्षीसघाती बंडखोर आमदारांनी हाती धरले कमळ!
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?



























Subscribe to my channel




