पुणेः केशवनगर, मुंढवा भागातील 'व्यंकटेश ग्राफिटी' सोसायटीत ३३ वर्षीय विवाहितेने साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, नणंद शैली संजय सकपाळ (वय ३१, रा. ओशिवरा, अंधेरी, मुंबई) हिला मुंबईतून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्रिष्णा बाळकृष्ण निकम (सासरचे नावः त्रिष्णा राहुल सकपाळ, वय ३३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील बाळकृष्ण जयराम निकम (वय ७४, रा. मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी पती राहुल संजय सकपाळ, सासू वैशाली संजय सकपाळ, सासरे संजय मनोहर सकपाळ, नणंद शैली संजय सकपाळ आणि आजीसासू शकुंतला साळुंके यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०८, ८५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
छळ, फ्लॅटची मागणी आणि घटस्फोटासाठी दबाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ पासून मृत त्रिष्णा हिला सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांसाठी, फ्लॅट खरेदी करण्यासाठी तसेच तिच्या वडिलांच्या नावावर असलेला व्यंकटेश ग्राफिटीमधील फ्लॅट नावावर करून देण्यासाठी त्रास दिला जात होता. पती राहुल याचे दुसरे लग्न करायचे असल्याने तिच्यावर घटस्फोट देण्यासाठी वारंवार दबाव आणला जात होता. तसेच नणंदेच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला जात होता. सासरच्यांच्या सततच्या शारीरिक, मानसिक त्रासाला आणि अपमानास्पद वागणुकीला कंटाळून त्रिष्णा हिने २९ सप्टेंबर २०२६ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनास्थळी सुसाईड नोट जप्त
आत्महत्येपूर्वी त्रिष्णा निकम हिने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये तिने पतीसह सासरच्या सर्व आरोपींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा आणि तिच्या मृत्यूला तेच जबाबदार असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट असलेली वही, साडीचे तुकडे, चाकू, पेन, दोन लॅपटॉप आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे. मृत महिलेच्या मोबाईलमध्ये आरोपींसोबत झालेल्या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंगही पोलिसांना आढळून आले आहे.
नणंदेला ट्रान्झिट रिमांडवर पुण्यात आणले
मुंढवा पोलिसांनी आरोपी नणंद शैली सकपाळ हिला ३ ऑक्टोबर रोजी मुंबईतील अंधेरी येथून अटक केली. अंधेरी रेल्वे मोबाईल कोर्टाकडून तिचा ट्रान्झिट रिमांड मिळवून तिला पुण्यात आणण्यात आले आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध घेणे, आर्थिक व्यवहारांचा तपास करणे आणि आरोपींच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी शैली सकपाळ हिची ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळण्याबाबत सहायक पोलीस निरीक्षक शिल्पा निमकर यांनी न्यायालयात रिमांड रिपोर्ट सादर केला आहे. मुंढवा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शहर
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
- पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी यांची एकमुखी निवड! २०२६ ते २०३१ साठी स्वीकारली धुरा
- मुंबई: एफडीए (FDA) मधून तुकाराम मुंढेंची बदली? सोशल मीडियावरील चर्चांवर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्वतःच केला मोठा खुलासा!
- मुंबई: ओ मुंडे काका, आमचा वडापाव सुरू करा ना; विद्यार्थ्याच्या निरागस मागणीवर आयएएस अधिकारी तुकाराम मुंडेंचे प्रेरणादायी उत्तर
महाराष्ट्र
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सांगली: गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने निवडणुकीतून पत्ता कट
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
गुन्हा
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!




























Subscribe to my channel




