Abhishek Sharma Suryakumar Yadav Team IndiaImage Credit source: @surya_14kumar x account
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीत यजमान टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात जबरदस्त कामगिरी करुन दाखवली. भारताने साखळी फेरीत अजिंक्य राहत विजयी चौकार लगावला. भारताने यूएसए, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्स या संघांना पराभूत करत आपला दबदबा कायम ठेवला. भारत 4 विजयांसह ए ग्रुपमधून टेबल टॉपर ठरली. आता टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफीच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकायला सज्ज झाली आहे. टीम इंडिया सुपर 8 मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 हात करणार आहे. या निमित्ताने भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20I वर्ल्ड कप आणि एकूणच टी 20I क्रिकेटमध्ये कामगिरी कशी आहे? हे आकड्यांच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
रविवारी टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका सामना
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचा हा सुपर 8 फेरीतील पहिलाच सामना असणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तसेच दोन्ही संघ साखळी फेरीत अजिंक्य राहिले आहेत. त्यामुळे रविवारी दोघांपैकी एका संघाच्या विजयी घोडदौडीला ब्रेक लागणार हे निश्चित आहे. अशात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर 8 मोहिमेची सुरुवात विजयाने करुन सलग पाचवा सामना जिंकण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दोघांपैकी सरस कोण?
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत आमनेसामने येण्याची ही आठवी वेळ ठरणार आहे. याआधी झालेल्या 7 पैकी सर्वाधिक सामन्यांत टीम इंडिया वरचढ असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. भारताने दक्षिण आफ्रिकेवर टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 7 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला 2 सामनेच जिंकता आले आहेत.
दोन्ही संघ 2024 फायनलनंतर आमनेसामने
भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ याआधी 2024 च्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. तेव्हा भारताने सनसनाटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी धुव्वा उडवत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला होता.
टीम इंडिया अहमदाबादमध्येही अजिंक्य
दरम्यान टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्येही अजिंक्य आहे. उभयसंघात या स्टेडियममध्ये एकमेव टी 20I सामना खेळवण्यात आला आहे. भारताने 2025 साली या मैदानात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 30 धावांनी सहज विजय मिळवला होता.
दक्षिण आफ्रिकेला भारताने विजयासाठी दिलेल्या 232 धावांचा पाठलाग करताना 201 पर्यंतच मजल मारता आली होती. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना सुपर 8 फेरीत उभयसंघात हायस्कोरिंग मॅच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


