सूर्यकुमार यादवकडून अभिषेक शर्माच्या उपकारांची फेड! सुपर 8 फेरीपूर्वी संघांना दिला इशाराImage Credit source: PTI
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा मधला टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी लढती होणार आहे. सुपर 8 फेरीत भारताचा पहिला सामना टी20 वर्ल्डकप 2024 उपविजेत्या दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. या सामन्यातील विजयी संघाचा उपांत्य फेरीच्या दिशेने सामना सुकर होणार आहे. असं असताना अभिषेक शर्माच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे. कारण या स्पर्धेत त्याला खातंही खोलता आलेलं नाही. साखळी फेरीतील तिन्ही सामन्यात शून्यावर बाद झाला. वर्ल्ड नंबर 1 फलंदाजाची अशी स्थिती पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे. पण टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला याबाबत काहीच वाटत नाही. उलट प्रतिस्पर्धी संघांना अभिषेक शर्माची भीती घालत आहे.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेला सामोरं गेला. तेव्हा त्याने सांगितलं की, ‘अभिषेक शर्माच्या फॉर्मची चिंता जे लोक करत आहेत. मला त्यांची चिंता वाटत आहे. मला त्या संघांची चिंता आहे जे अभिषेकचा सामना करणार आहेत. मागच्या वर्षात त्याने सर्व काही केलं. आता आमची पाळी असून त्याचे उपकार फेडायचे आहेत.’ टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अभिषेक शर्मा टीम इंडियाची ताकद मानली जात होती. पण साखळी फेरीतील त्याच्या कामगिरीने प्लेइंग 11 मध्ये ठेवायचं की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाला. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि रूग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळला आणि शून्यावर बाद झाला. नेदरलँडविरुद्धही तसंच झालं.
एका महिन्यात अभिषेक शर्मा 8 टी20 सामन्यापैकी 5 सामन्यात शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे चिंता तर वाटणारच.. दुसरीकडे, संजू सॅमसनही फॉर्मात नाही. त्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. असं असलं तरी भारताने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले. आता सुपर 8 फेरीत खरी कसोटी आहे. कारण येथे तगड्या संघांचा सामना करावा लागणार आहे. उपांत्य फेरीसाठी भारताला किमान दोन सामने जास्त नेट रनरेटने जिंकावे लागणार आहेत.
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!


























Subscribe to my channel


