छत्रपती संभाजीनगर: "शासनाने मला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला, दडपशाही केली किंवा माझ्याविरोधात षडयंत्र रचले तरी मी एक पाऊलही मागे हटणार नाही. मी मरेन; पण सरकारपुढे कधीही शरण जाणार नाही. गुलाम होण्यापेक्षा समाजाच्या हक्कासाठी लढता लढता मरणे मी पसंत करेन," असा अत्यंत आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना सोमवारी (दि. २८ सप्टेंबर २०२६) त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी तुरुंगात जाण्याची आमची पूर्ण तयारी असल्याचे स्पष्ट केले.
"मित्र असलेले एकनाथ शिंदे शत्रू निघाले"
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट राजकीय तोफ डागताना जरांगे म्हणाले, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः माझ्याविरोधात बैठका घेत आहेत. तुम्ही कितीही लोक माझ्या अंगावर घातले तरी मी मागे हटणार नाही. आम्ही नेहमी फडणवीस साहेबांवर बोलत राहिलो; मात्र जे स्वतःला मित्र म्हणवत होते, तेच एकनाथ शिंदे आज आमचे शत्रू निघाले आहेत." आपण कोणालाही शरण जात नाही, 'मॅनेज' होत नाही आणि त्यांचे ऐकत नाही, म्हणूनच सत्ताधाऱ्यांना आपण वैरी वाटत असल्याचा घणाघात त्यांनी केला. केवळ शिवीगाळ केल्याच्या कारणावरून कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने कारवाया केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी आगामी राजकीय आणि आंदोलनात्मक भूमिकेबाबत महत्त्वाची घोषणा केली. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या पुढील आणि आंदोलनाची दिशा काय असेल, याबाबतचा अंतिम निर्णय आगामी 'दसरा' सणानंतर जाहीर केला जाईल. दसऱ्यानंतर मराठा समाज एकत्र येऊन पुढील आंदोलनाची नवीन व व्यापक दिशा ठरवणार असून सरकारला आरक्षणासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, या आंदोलनात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसून जोपर्यंत हक्काचे कुणबी प्रमाणपत्र व सरसकट आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
शहर
- नागपूर: "देशातील संविधान संपवून कम्युनिस्ट विचारसरणी लादण्याचा काँग्रेसचा डाव" राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर सत्ताधारी नेत्यांचा अत्यंत गंभीर व आक्रमक हल्लाबोल!
- मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर
- मुंबई: "मनोज जरांगे एक नंबरचा चोर माणूस..."कोअर कमिटी सदस्य संजय कटारेवर ४ कोटींच्या वाळू चोरीप्रकरणी कारवाईनंतर अजय बारस्कर यांचा जळजळीत हल्लाबोल!
- मुंबई: दादा, आज आठ महिने झाले तरी.. दिवंगत अजितदादांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अत्यंत भावूक पोस्ट!
महाराष्ट्र
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- सातारा: वयाच्या पंच्याहत्तरीतही विशीसारखा उत्साह! वाईच्या जिद्दी आजीने सलग ९ वेळा वाचन करून स्वहस्ताक्षरात संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली
- ठाणे: कोपरी पोलीस ठाण्यातच महिलांनी युट्युब भाई सिद्धू अभंगेला धुतले; पोलिसांसमोरच घडला राडा
- सांगली: कुंडलच्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात हरियाणाच्या हिंदकेसरी दिनेश गोलियाने महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचा 'घुटना' डावावर केला पराभव
गुन्हा
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल




























Subscribe to my channel




