आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत साखळी फेरीतील 40 व्या आणि शेवटच्या सामन्यात बी ग्रुपमधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान संघ आमनेसामने होते. ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्श याच्या नेतृत्वात साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकून आपल्या मोहिमेचा शेवट गोड केला. ऑस्ट्रेलियाचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं होतं. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ओमान विरुद्ध जिंकण्यात यशस्वी ठरणार का? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने त्यांच्या तुलनेत लिंबूटिंबु असलेल्या ओमानवर मात करत या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला. तर ओमान विजयाचं खातं उघडण्यात अपयशी ठरली. ओमानचा हा सलग आणि एकूण चौथा पराभव ठरला.
एडम झॅम्पा याने घेतलेल्या 4 विकेट्स आणि त्यानंतर कॅप्टन मिचेल मार्श याने केलेली नाबाद अर्धशतकी खेळी या जोरावर ऑस्ट्रेलियाने ओमान विरुद्ध एकतर्फी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सने ओमानला पराभवाची धुळ चारली. या सामन्याचं आयोजन हे पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं.
सामन्यात काय झालं?
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून ओमानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कॅप्टन मिचेल मार्श याचा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. ऑस्ट्रेलियाने ओमानला 22 बॉलआधी ऑलआऊट केलं. ओमानने 16.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 104 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 62 बॉलआधी विजयी धावा पूर्ण केल्या. ऑस्ट्रेलियाने 9.4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 108 धावा केल्या.
कॅप्टन मार्शची विजयी खेळी
मिचेल मार्शन याने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा केल्या. मार्शने 33 बॉलमध्ये नॉट आऊट 64 रन्स केल्या. हेडने 19 बॉलमध्ये 32 धावांचं योगदान दिलं. तर जोश इंग्लिस 12 धावा करुन नाबाद परतला. त्याआधी ओमानसाठी वसीम अली याने सर्वाधिक32 धावा केल्या. तर इतरांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. एडम झॅम्पा याने 3.2 ओव्हरमध्ये 21 धावा देत ओमानच्या 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. ग्लेन मॅक्सवेल आणि झेव्हीयर बार्टलेट या दोघांनी 2 विकेट्स घेतल्या. तर मार्कस स्टोयनिस आणि नॅथन एलिस या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
ऑस्ट्रेलियाची निराशाजनक कामगिरी
दरम्यान ऑस्ट्रेलियाला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलिया टीमने साखळी फेरीत 4 पैकी 2 सामने जिंकले तर तितकेच सामने गमावले. ऑस्ट्रेलियाला झिंबाब्वे आणि श्रीलंकेकडून पराभूत व्हावं लागलं. तर ऑस्ट्रेलियाने ओमानआधी आयर्लंडवर विजय मिळवला.
शहर
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
महाराष्ट्र
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- कोल्हापूर: निधी मिळत नसल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप; आमदार सतेज पाटील यांचा मोठा दावा!
- जळगाव: महाराष्ट्रात दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार? आमदार बच्चू कडू यांचे मोठे भाकीत, जळगावमधून किशोर पाटलांना मंत्री करण्याची मागणी!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




