ब्रिक्स परिषदेत जे तीन ताकदवान नेते (जिनपिंग, पुतीन,मोदी) एकत्र आले, त्यांच्यात भूतकाळात समन्वयापेक्षाजास्त मतभेदच राहिले आहेत. त्यांचा प्रत्येकाचा जगाकडेपाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तसेच, त्यांचे प्रतिस्पर्धीहीवेगवेगळे आहेत. रशिया हा चीनचा साथीदार आहे आणिकाही अंशी चीनवर अवलंबूनही आहे. भारत मात्र चीनकडेआपला अस्तित्वाचा प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो. तर दुसरीकडे,खेळाचे नियम आपणच ठरवू शकतो आणि पंचही आपणचबनू शकतो, असे चीनला वाटते. ब्रिक्सला ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’(एससीओ) सारखे मानले जाऊ शकते. पण यावर चीनचेवर्चस्व जवळपास प्रस्थापित झालेले आहे. ही चीनची एकबहुपक्षीय संघटना आहे. ओआयसी (ऑर्गनायझेशन ऑफइस्लामिक को-ऑपरेशन) या 57 देशांच्या निरर्थकवाटणाऱ्या गटाला जोडणारा किमान एक धागा तरी आहे, तोम्हणजे इस्लाम. इस्लामी देशांवर आलेली संकटे असोत,त्यांच्यात झालेली युद्धे असोत, किंवा आज अरब देश आणिइराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष असो, या गटाने आपलाकोणताही दबदबा निर्माण केलेला तुम्हाला दिसणार नाही. ब्रिक्सच्या सदस्य देशांमध्ये नेमका काय समान धागाआहे, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. ही ट्रम्पकिंवा अमेरिकेविरोधातील एखादी संयुक्त आघाडी आहेका? तर अजिबात नाही. पुतीन आणि ट्रम्प हे तर एकमेकांचेकौतुक करणारे मित्र आहेत. जिनपिंग हेदेखील लवकरचअमेरिकेला जाणार आहेत. दोन्ही देशांमधील कटुता दूरकरण्याचा ते प्रयत्न करू शकतात. ट्रम्प यांनी आपलीधोरणात्मक मोहीम स्वतःपुरतीच मर्यादित ठेवावी, यासाठीजिनपिंग त्यांना प्रोत्साहित करू शकतात. तैवानला विसरूनजा, असा सल्लाही ते ट्रम्प यांना देऊ शकतात. जिनपिंग यांच्यासाठी ट्रम्प ही सर्वात मोठी संधी आहे. ट्रम्पअमेरिकेच्या आघाड्या कमकुवत करत आहेत. स्वतःवरील धोका कमी करण्यासाठी या आघाड्यांमधील काही देश चीनकडे वळू शकतात. त्या वेळी चीन स्वतःसाठी काही सवलती पदरात पाडून घेईल. दुसरे म्हणजे, कमकुवत आणि छोट्या देशांनी चीनकडे नवा ‘दादा’ म्हणून पाहायला आणि त्याला सलाम ठोकायला सुरुवात केली आहे. जिनपिंग हे किमान ट्रम्प यांच्यासारखा उघडपणे अपमान तरी करतनाहीत. रशियाचा विचार केला तर ती चीनच्या सीमेलालागून असलेली महासत्ता आहे. जगातील सर्वाधिकअण्वस्त्रे रशियाकडेच आहेत. तसेच, पाइपद्वारे उपलब्ध होणाऱ्या ऊर्जेच्या सुरक्षित स्रोतांचा रशिया मालक आहे. भारताच्या सीमांवर नेहमीच तणाव असतो आणिसैन्याची तैनाती असते. व्यापार वाढावा यासाठी जिनपिंगयांना स्थिरता हवी आहे. आपल्याला माहीतच आहे की, भारत-चीन व्यापार ही एकतर्फी गोष्ट आहे. सध्या चीनचाजो एकूण व्यापार अतिरिक्त (सरप्लस) आहे, त्यातील जवळपास 10 टक्के वाटा म्हणजेच 112 अब्ज डॉलर्सभारताच्या वाट्याला आहेत. अमेरिकेसोबतचा त्यांचासरप्लस घटत आहे, त्यामुळे जिनपिंग पर्यायांच्या शोधातआहेत आणि भारताने एक पाऊल पुढे टाकले आहे.चीनमधील लोकसंख्येचे संकट आणि देशांतर्गत मागणीत झालेली मोठी घट, यामुळे चीनला या व्यापार सरप्लसचीजास्त गरज आहे. म्हणूनच, जिनपिंग यांनी भारताच्या सीमेवरून आपले लक्ष थोडे बाजूला काढले आहे. 1988 मध्ये डेंग शियाओपिंग यांनी बीजिंगमध्ये राजीवगांधी यांना सांगितले होते की, सीमावाद सोडवण्याइतकीसमज कदाचित आपल्या पिढीत नाही. त्यामुळे हा प्रश्नआपण भविष्यातील अधिक समजूतदार पिढीसाठीच सोडूनदेऊ. जिनपिंग यांच्यासाठी ते भविष्य कदाचित अद्यापआलेले नाही. भारत आणि चीनमधील दरी आणखीरुंदावेपर्यंत ते कदाचित अजून वेळ घेऊ इच्छित असतील.याच दरम्यान, पाकिस्तान तर त्यांच्या बाजूने आहेच. तोभारताचा समतोल बिघडवण्याचे काम करतच राहील. जिनपिंग यांच्याप्रमाणेच ‘नाटो’ कमकुवत झाल्यामुळेपुतीनही खुश आहेत. युक्रेनबाबत काहीतरी तडजोड होईलआणि आपण आपल्या विजयाची घोषणा करू, अशीअपेक्षा ते करत आहेत. किंवा युक्रेनला मिळणारीअमेरिकेची मदत कमी होईपर्यंत आणि युरोप आपलीभूमिका बदलेपर्यंत ते लढत राहतील. थोडक्यात , जिनपिंग हेअमेरिकेविरोधात जगाला एकत्र करणार नाहीत आणिपुतीनही अशा धाडसात सामील होणार नाहीत. जिनपिंग यांच्या उलट, पुतीन यांना भारताकडूनकोणतीही अडचण नाही. मात्र, त्यांची पहिली इच्छाजिनपिंग यांच्या इच्छेपेक्षा वेगळी नाही. त्यांनाही एकतर्फीव्यापार संबंधच हवे आहेत. चीन वगळता इतर सर्व देशांच्यातुलनेत भारत त्यांच्याकडून जास्त तेल खरेदी करत आहेआणि त्यासाठी त्यांना धन्यवाद देण्यासही भारत तयार आहे.भारत रशियन शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा विद्यमान आणिभावी खरेदीदार बनून राहण्यास तयार आहे. विशेषतः जेव्हानिर्बंध हटवले जातील, तेव्हा हे अधिक शक्य होईल. केवळतेलाच्या जोरावर, भारतासोबतचा रशियाचा व्यापारसरप्लस 50 अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. रशिया हा एकउदार व्यापारी भागीदार आहे. भारताला असे संरक्षणतंत्रज्ञान देण्यास रशिया तयार आहे, जे दुसरा कोणताही देशदेऊ इच्छिणार नाही. पण, जर तुम्हाला वाटत असेल कीपुतीन भारताला बरोबरीचा दर्जा देतील, किंवा रशियाभारताला चीनसारखा महत्त्वाचा देश मानेल, तर तुम्हीतुमचा दृष्टिकोन बदलायला हवा. ब्रिक्स शिखर परिषदयाच समीकरणांच्या सावटाखाली पार पडली. यामध्ये भारतहा सर्वात शक्तिशाली देश नव्हता. भारत आज प्रचंड व्यापारतूट स्वीकारण्यास मजबूर आहे. कारण, गरजेच्या गोष्टी तोबाहेरून खरेदी करत आहे. चीनमधून सुटे भाग, कच्चा मालकिंवा मोठ्या प्रमाणावर रसायने आली नाहीत, तर भारताचीबहुतांश निर्यात थांबेल. चिनी आयातीचा सर्वात मोठासमर्थक भारतीय व्यवसाय आणि उद्योग जगतच आहे.याशिवाय, भारताला ‘एलएसी’वर शांतता हवी आहे. चीन अमेरिकेला शत्रू मानत नाही, तर तो अमेरिकेलास्वतःच्या बरोबरीचा मानू इच्छितो. अमेरिकाही भारताचाशत्रू नाही. एकापाठोपाठ एक, तीन भारतीय पंतप्रधानांनीभारत-अमेरिका संबंधांना नैसर्गिक धोरणात्मक भागीदारीम्हणत त्याचे स्वागतच केले आहे. आता राहिला प्रश्नडॉलरचे वर्चस्व संपवण्याचा? अमेरिकन डॉलर जेव्हाशून्यावर येईल, तेव्हा काय होईल? ‘ब्रिक्स’ नावाचे चलनत्याची जागा घेईल का? जर तुम्हाला अमेरिकन डॉलरसंपुष्टात यावा असे वाटत असेल, तर तुम्ही चिनी चलन‘युआन’च्या युगात जगायला तयार आहात का? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) सत्तासंतुलनात भारताचेस्थान नेमके कुठे असेल...?चीन अमेरिकेला शत्रू मानत नाही, तर तोअमेरिकेला स्वतःच्या बरोबरीचा मानूइच्छितो. पुतीन यांनाही भारताकडूनकोणतीही अडचण नाही. पण त्यांनाहीएकतर्फी व्यापारी संबंधच हवे आहेत. तुम्हालावाटत असेल की पुतीन भारताला चीनच्याबरोबरीचा देश मानतील, तर तुम्ही तुमचादृष्टिकोन बदलायला हवा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




