
Nashik : भोंदूबाबा अशोक खरात हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. राज्य सरकारने अशोक खरातच्या प्रकरणात स्थापन केलेल्या एसआयटीकडून आज चौथ्या दिवशीही तब्बल सात तास अशोक खरातची चौकशी करण्यात आली आहे. अशोक खरात याच्यावर आज आणखी एका महिलेने अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अशोक खरात याच्या विरोधात आज दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. खरात याच्या एसआयटी चौकशीनंतर क्राइम ब्रांचने अशोक खरातचा ताबा घेतला. अशोक खरातला आज क्राइम ब्रांच युनिट एकमध्ये आणण्यात आले. या दरम्यान अशोक खरातचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अशोक खरात हा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं बोलताना दिसत आहे.
अशोक खरात याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्याची कसून चौकशी सुरु आहे. या दरम्यान त्याला आता पोलिसी खाक्या मिळताना दिसत आहे. त्याचाच परिणाम संबंधित व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओत तो पोलिसांसोबत लंगडत चालत आहे. यावेळी तो नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, अशी घोषणा करतो. तसेच ताकद नाही राहिली, असंही तो बोलताना दिसतोय.
दरम्यान, अशोक खरातच्या चौकशी दरम्यान कमालीची गुप्तता देखील पाळली जात असल्याचं दिसत आहे. अशोक खरात याची SIT मार्फत गेल्या 4 दिवसांपासून कसून चौकशी केली जात आहे. खरात याच्या महिलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडिओ, त्याची करोडोची मालमत्ता, त्याच्या कार्यालयातील कॉम्प्युटर्स, त्याचे अध्यक्ष असलेल्या खाजगी संस्थान या संपूर्ण प्रकाराची SIT च्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्याकडून आणि अन्य अधिकारी यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे. गेल्या ३ दिवसांपासून खरात याची नाशिकच्या पोलीस हेडक्वार्टर येथील हिमांशू पोलीस क्लब येथे तासंतास चौकशी केली गेली आहे. यातच रविवारी देखील खरात याची SIT कडून चौकशी करण्यात आली. मात्र आज SIT कडून खरात याची आज कमालीची गुप्तता बाळगत शहरातील एका अज्ञातस्थळी त्याची कसून चौकशी करण्यात आली.
एकूणच भोंदू बाबा अशोक खरात याच्या तपासप्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसून येत आहे. एकाच वेळी खरातच्या महिला लैंगिक अत्याचार, अन्य गुन्हे, कोट्यावधींची संपत्ती, व्यवहारांची आणि संस्थानच्या संदर्भातील SIT चौकशी ही केली जात असून, आता या प्रकरणात काय महत्त्वाचे धागे-दोरे पोलिसांच्या हाती लागतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




