Mumbai : गोरेगावमध्ये भीषण आग: गोकुळधाम परिसरातील इमारतीत धुराचे लोट, महिलेचा होरपळून मृत्यू

Mumbai : मुंबईच्या गोरेगाव भागात असणाऱ्या गोकुळधाम परिसरात लक्ष चंडी बिल्डिंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. काल संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावर एका घरात ही मोठी आग लागली होती. या आगीमध्ये एका महिलेचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे घरामध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्यांचं पाचारण करण्यात आलं. तब्बल एका तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश मिळालं. अचानक बिल्डिंगमध्ये आग लागल्यावर धूर पसरल्यामुळे मोठ्या संख्येमध्ये तिथे राहणारे लोक अडकले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी सर्व अडकलेल्या लोकांना सुखरुप बाहेर काढलं. या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झालं आहे, तर एक महिलेचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आग कशामुळे लागली यासंदर्भात अधिक तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आगीमध्ये मृत्यू झालेल्या महिलेचं नाव इंदू तारकेश्वर सिंग (वय ७२) असं होतं.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *