पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:‘एआय’च्या युगात प्रत्येक कृती‎मानवी मूल्यांशी जोडलेली असावी‎

समाजसेवेच्या जगात एक शब्द वापरला जातो, तो म्हणजे‎‘जनजागृती’. हे काम सर्वात आधी श्रीरामांनी केले. त्यांचा उद्देश केवळ‎रावणाला संपवणे हा नव्हता. त्यांना लोकांना जागृत करायचे होते.‎लोकांना जागृत करणे म्हणजे, तुम्ही जे काही काम करत आहात, ते‎बरोबर आहे की चूक हे समजणे. जर तुम्ही निर्भय आणि निष्काम‎भावनेने काम केले, तर ही जनजागृती मानवी मूल्यांशी जोडली जाते.‎सध्या ‘एआय’ जनजागृतीची भूमिका बजावत आहे, पण ते मानवी‎मूल्यांशी जोडले जाऊ शकत नाही. हळूहळू स्वतःचे आत्मपरीक्षण‎करण्याची प्रवृत्तीच नष्ट होईल. आपण जे केले तेच बरोबर आहे, असे‎लोक मानून चालतील. जास्तीत जास्त ते ‘एआय’कडून याची खात्री‎करून घेतील. जेव्हा एखादी व्यक्ती चोरी करते, तेव्हा आपण तिची‎निंदा करतो. पण ज्या गोष्टी त्याने चुकीच्या मार्गाने मिळवल्या आहेत,‎त्याच गोष्टी आता आपण प्रामाणिकपणे घेत असतो. पण या दोन्हींमध्ये‎एक गोष्ट आहे, ती म्हणजे आसक्ती. चोराची बेइमानीमध्ये आसक्ती‎होती, म्हणून तो चूक करून गेला. जर आपल्या प्रामाणिकपणातही‎आसक्ती असेल, तर आपला प्रामाणिकपणाही बेइमानीत बदलेल.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *