गोवा: भारताला पूर्णपणे अंमली पदार्थमुक्त (ड्रग्जमुक्त) करण्यासाठी केंद्र सरकारने एक ठोस आणि कालबद्ध तीन वर्षांचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅप अंतर्गत ठरावीक उद्दिष्टे निश्चित करण्यात आली असून, त्याबद्दल नियमितपणे आढावा घेतला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गोव्यात केली. सांताक्रूझ-पणजी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे प्रामुख्याने उपस्थित होते.
तीन वर्षांचा विशेष रोडमॅप आणि ठोस उद्दिष्टे: बैठकीनंतर माहिती देताना गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले की, देशातील अमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्याला आळा घालण्यासाठी सरकारने तीन वर्षांची विशेष योजना आखली आहे. या रोडमॅपमध्ये गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या आधारे कठोर कारवाई करणे, सिंथेटिक ड्रग्जच्या तस्करीवर पूर्ण नियंत्रण मिळवणे, अमली पदार्थांची मागणी कमी करणे, प्रभावी व्यसनमुक्ती आणि हानी कमी करण्याच्या उपाययोजना राबवणे, तसेच संबंधित तपास यंत्रणांची क्षमता वाढविणे या प्रमुख मुद्यांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
पुढील तीन वर्षांच्या कालावधीत देशभरातील किमान १०० मोठ्या ड्रग्ज नेटवर्कचा पूर्णपणे नायनाट करण्याचे आणि अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीशी संबंधित १०० फरार आरोपींना कायदेशीर मार्गाने भारतात परत आणण्याचे कठोर लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे. अमली पदार्थांच्या या अवैध जाळ्याविरोधात केवळ किरकोळ कारवाई न करता, तस्करीची संपूर्ण साखळी, त्याचे आर्थिक स्रोत आणि आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त करण्यावर सरकारचा मुख्य भर राहणार असल्याचे शाह यांनी आवर्जून सांगितले.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठे आव्हान आणि दहशतवादाशी संबंध: ड्रग्ज तस्करी ही केवळ एक सामान्य सामाजिक समस्या नसून ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर आव्हान आहे, असे सांगत अमित शाह म्हणाले की, अमली पदार्थांच्या अवैध तस्करीतून मिळणारा काळा पैसा अनेकदा दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा (Terror Funding) करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळेच हा लढा केवळ तस्करांना अटक करण्यापुरता मर्यादित नसून, यामागील संपूर्ण आर्थिक साखळी आणि दहशतवादी संबंध नष्ट करण्याचा आहे.
नक्षलवाद आता भूतकाळाची गोष्ट: यावेळी बोलताना शाह यांनी देशातील इतर सुरक्षा मुद्यांवरही भाष्य केले. जम्मू-काश्मीरमधून कलमी ३७० हटवल्यानंतर तिथल्या फुटीरतावादात मोठी घट झाली असून दहशतवाद शून्याच्या दिशेने जात आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच, देशातील नक्षलवादाचा मुद्दा आता 'भूतकाळाची गोष्ट' बनला असल्याचे सांगत, सुरक्षा दलांच्या धडक कारवायांमुळे नक्षलवादाचे कंबरडे मोडले असल्याचे स्पष्ट केले.
गोव्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत गोव्यातील कायदा व सुव्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात आला. राज्यात तीन नवीन न्यायसंहितांची प्रभावी अंमलबजावणी कशी सुरू आहे, यावरही चर्चा करण्यात आली. गोव्याशी संबंधित विविध प्रशासकीय आणि विकासात्मक मुद्द्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी गृहमंत्री शाह यांनी दिले.
शहर
- नाशिक: ठक्कर बाजार बसस्थानकात मोठी दुर्घटना; त्र्यंबकेश्वरला जाताना गर्दीत धक्का लागल्याने बसखाली आल्याने १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
महाराष्ट्र
- गोवा: २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेची मोठी तयारी; २१ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel



