‘शहर से दस किलोमीटर’ नावाच्या कादंबरीत नीलेश रघुवंशी यांनी भोपाळपासून काही अंतरावरील एका आयुष्याचे वर्णन केले आहे. हे आयुष्य फुलणारे आहे. ते अडचणी व आव्हानांनी भरलेले आहे. तरीही ते अत्यंत खोल व तत्वज्ञानात्मक आहे. छोटे गाव आणि शहर—ते आपल्या सीमांच्या पलीकडच्या आयुष्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ आहे—यांच्यातील येण्या-जाण्याचा प्रवास या कथेतील निवेदकाची सायकल पूर्ण करते. एका सूत्रासारखी व नोंदीसारखी ती सायकल त्या जागेच्या शेवटच्या खुणांपैकी एक आहे. ती जागा आता शहराच्या एका निनावी, नव-उदारवादी व साध्याशा विस्तारात रुपांतरित झाली. त्याला ओळखणे कठीण झाले आहे.
कादंबरीत सायकलीशी जोडलेल्या बालपणीच्या आठवणी खूप स्पष्टपणे वर येतात. कारण ‘बालपणात लहान-लहान पाय हेच मोठे पंख असतात.’ एक स्त्री निवेदक काळ्या दांड्याची सायकल असायची. त्या दिवसांची आठवण करून देते. आज मिळणाऱ्या गुलाबी आणि सुंदर लेडीज सायकल तेव्हा नव्हत्या. मुली सायकल चालवतील, अशी कल्पनाही तेव्हा केली जात नव्हती. पण आपली निवेदक तर जेंट्स सायकलही अगदी बिनधास्त चालवायची—‘मी अगदी धडाक्यात सायकल चालवू लागले. कधी वाकून तर कधी ताठ बसून, कधी शिट्टी वाजवत तर कधी नागमोडी वळणे घेत, कधी हँडल आणि स्वतःला तिरपे करत, कधी एक हात सोडून, तर कधी सीटवरून वर उठून दोन्ही हात सोडून. मी सायकलीसोबत जणू डोलत होते.’ सायकल म्हणजे फक्त एक रोमांच नाही, ते एक राजकारणही आहे. ती एका काळाची,जीवनशैलीची खूण आहे. सायकल केवळ गरिबी किंवा अभावाचे प्रतीक नव्हती. ही कादंबरी वाचताना मी भूतकाळात निघून गेले. त्या भूतकाळात वेळ आणि एक जागाही आहे. मला जुन्या गोष्टी आठवू लागल्या—अजमेरमध्ये घालवलेल्या उन्हाळ्याच्या लांब व संथ सुट्ट्या. तिथे माझ्या आईचे माहेर आहे. मी प्रत्येक उन्हाळ्यात तिथे जायचे. प्रभात टॉकीजजवळच्या एका छोट्या दुकानातून मी पुस्तके भाड्याने घ्यायचे आणि तासन् तास कर्नल रंजीत आणि राजहंस यांच्या कादंबऱ्या वाचायचे. मी खूप खूश असायचे. कारण मी पुस्तके घ्यायची त्याच दुकानातून मला सायकलही मिळायची. संपूर्ण दिवसासाठी सायकलीचे भाडे एका रुपयापेक्षाही कमी असायचे. सायकल चालवणे आणि कादंबरी वाचणे या आनंदाने तो उन्हाळा खास बनवला होता. वेगवेगळ्या ठिकाणी वेळेची जाणीव वेगळी असते. आपल्या घड्याळात टिक-टिक करते ती ही वेळ नाही. हा वेळ मागे शांत आणि स्थिर राहतो—एखाद्या खिडकीसारखा. यातून आत आणि बाहेर दोन्हीकडे पाहता येते. मोठ्या शहरांमध्ये वेळेचे हे रूप पाहायला मिळत नाही. या वेळेतील शांततेला खूप कमी लेखक टिपू शकतात. पण ते तसे करतात, तेव्हा आपल्याला विनोद कुमार शुक्ल, सारा राय किंवा नीलेश रघुवंशी यांच्यासारखे लेखक मिळतात. पण ‘बरेली की बर्फी’ किंवा ‘तनु वेड्स मनु’ यांसारखे चित्रपटांना आता लहान शहरांतील चित्रपट म्हटले जाते—त्यांच्यात ही शांतता सिनेमॅटिक रूपात दिसते का? या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी, कोणीही असा प्रश्न विचारू शकतो की शेवटी ‘लहान शहर’ म्हणजे तरी काय? अजमेरसोबतचा माझा अनुभव कदाचित एखाद्या लहान शहरासारखाच होता. मला पूर्ण खात्री आहे की आजचे अजमेर माझ्या या व्याख्येला आव्हान देईल. गेल्या एक-दोन दशकांत आपण लहान शहरांवर आधारित चित्रपट आणि मालिकांची लाट पाहिली आहे. यांची सुरुवात कदाचित ‘बंटी और बबली’ने झाली होती. तुम्ही पाहा, बंटीला फक्त ती जागा सोडायची नाहीये, तर वेळेच्या मंद वेगापासून दूर पळायचे आहे. ‘फुरसतगंज’ हे ठिकाण या वेळ आणि जागेला किती सुंदरपणे एकत्र आणते. तेथून नव्या भारताचे अस्वस्थ तरुण दूर पळू इच्छितात. बबली ही ‘पंकीनगर’ची आहे. आपण बरेली, धनबाद किंवा मिर्झापूरमध्ये येतो, तेव्हा त्यांच्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याची धडपड दिसते. लहान शहर म्हणजे एखादे स्टेशन नाही किंवा ‘मदर इंडिया’मधले गावही नाही. लहान शहर म्हणजे मध्यमवर्गाच्या नव्या आशा आणि आकांक्षा जन्माला येतात, अशी जागा होय. माणूस त्या इच्छांशी सतत झुंजत असतो. चित्रपटांनी या संघर्षाला विनोदी शैलीत दाखवले आहे, कुठल्याही तणावाच्या रूपात नाही. आपण आता ‘गोरी का गांव’ व मुंबई-कोलकात्याच्या काळ्या बाजाराला खूप मागे टाकले आहे. सखोलतेचा शोध असणाऱ्यांना शहरापासून काही मैल दूर जावे लागेल, आणि तेही सायकलवर! (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) लहान शहर म्हणजे मध्यमवर्गाच्या नव्या आकांक्षा जन्माला येतात असे ठिकाण. माणूस त्या इच्छांशी सतत झुंजत असतो. चित्रपटांनी या संघर्षाला विनोदी शैलीत दाखवले. तणावाच्या रूपात नाही. ‘गोरी का गांव’ आणि मुंबई-कोलकात्याच्या काळ्या बाजाराला खूप मागे टाकले.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




