इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल आथरटन यांनीक्रिकेटसाठी कितीही मोठे योगदान दिले असले, तरी आताते इम्रान खान यांच्या भविष्याचा प्रश्न जगासमोरआणण्यासाठी ओळखले जातील. पाकिस्तानचे सत्ताधारीकाश्मीरचा मुद्दा गेली 75 वर्षे आंतरराष्ट्रीय मंचावर उचलूनधरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, इम्रानचा मुद्दा देशाच्यासीमेबाहेर जावा, अशी त्यांची अजिबात इच्छा नव्हती.आथरटन यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅटकमिन्सनेही इम्रानच्या बाजूने आवाज उठवला. लॉर्ड्सच्या‘लाँग रूम’मध्ये इम्रानची मुले, कासिम आणि सुलेमानयांच्याशी संवाद साधल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळायलाहवा. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी लंच ब्रेकदरम्यान‘स्काय स्पोर्ट्स’ वाहिनीने ही मुलाखत प्रसारित केली.पीसीबीने या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकीदेऊनही वाहिनीने हा निर्णय घेतला. सध्या मोहसीन नक्वी पीसीबीचे नेतृत्व करत आहेत. तेपाकिस्तानचे गृहमंत्रीही आहेत. तसेच, लष्करप्रमुख असीममुनीर यांचे ते अत्यंत जवळचे आणि निष्ठावान सहकारीमानले जातात. ही मुलाखत प्रसारित करून ‘स्कायस्पोर्ट्स’ने मोठी जोखीम पत्करली होती. यामुळेत्यांच्याकडून कसोटी मालिकेचे प्रसारण हक्क हिरावूनघेतले जाण्याची शक्यता होती. आथरटन यांचा पाकिस्तानीव्हिसा रद्द होऊ शकला असता आणि ईसीबीनेपाकिस्तानचा विश्वास गमावला असता. मात्र, या तिघांनीहीही जोखीम पत्करली आणि इम्रानच्या भविष्याचा प्रश्नपाकिस्तानच्या रक्तरंजित राजकारणातून बाहेर काढून थेटआंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मंचावर आणला. पाकिस्तानच्यासत्ताधाऱ्यांना या मुद्द्याचे ‘क्रिकेटीकरण’ अजिबात नकोहोते. तरीही, क्रिकेटच्या 21 माजी कर्णधारांनी (ज्यातभारताच्या 3 कर्णधारांचा समावेश आहे) इम्रानला चांगलीवागणूक मिळावी, अशी मागणी करणारे संयुक्त पत्र काढले आहे. एका कसोटी सामन्यातील हा लंच ब्रेक पाकिस्तानच्या राजकारणासाठी खूप मोठा आणि परिणामकारक काळठरला आहे. आता इम्रान आणि त्यांची पहिली पत्नी जेमिमा यांच्यादोन्ही मुलांनी आपल्या वडिलांबद्दलचे प्रेम आणि गंभीरचिंता व्यक्त केली आहे. (इम्रान यांची तिसरी पत्नी बुशराबीबी यादेखील सध्या तुरुंगात आहेत). पाकिस्तानसहसंपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष आता इम्रान यांच्याकडे लागले आहे. पाकिस्तानचे सर्वात लाजिरवाणे गुपित आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनले आहे. आथरटन यांनी हे सगळे जुन्या मैत्रीच्या खातर केले का? एका महान क्रिकेट ‘आयकॉन’वर होत असलेला अन्याय आणि त्यांना हळूहळू मृत्यूच्या दाढेत ढकलले जाणे, या गोष्टींमुळेकदाचित ते व्यथित झाले असावेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही इम्रान यांची लोकप्रियता कमी झाली नव्हती. टेलिव्हिजनवरील कॉमेंट्रीमुळेही ते खूप प्रसिद्ध होते. भारतीय मीडिया कॉनक्लेव्हमध्ये वक्ता म्हणून त्यांना सर्वाधिकमानधन मिळायचे. आथरटन कधीही इम्रान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाविरुद्ध खेळले नाहीत.त्यांनी 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवातकेली आणि इम्रान 1992 मध्ये निवृत्त झाले. इम्रानच्यागोलंदाजीवर बाद होण्याचा ‘आनंद’ आथरटन यांना कधीमिळाला नाही. पण आज ते इम्रानच्या बाजूने खेळत आहेत.देशाच्या लष्करासोबत वाद सुरू झाल्याच्या पहिल्यादिवसापासूनच इम्रान यांना एक गोष्ट समजली होती. तीम्हणजे, जर ते राजकारणातून बाजूला झाले आणि पुन्हाटेलिव्हिजनच्या फायदेशीर जगात परतले, तर त्यांचे आयुष्यआरामात जाऊ शकते. लष्कराशी उभा दावा असणाऱ्याइतर सर्व नेत्यांप्रमाणे त्यांच्याकडेही ‘श्रीमंतीतलाअज्ञातवास’ स्वीकारण्याचा सोपा पर्याय उपलब्ध होता. पणइम्रान यांनी धाडसाने लष्करालाही आश्चर्यात टाकले. असे असले तरी, एक कटू सत्य हेही आहे की इम्रानयांनीही सोयीनुसार हाच खेळ खेळला. लष्कराशीहातमिळवणी करून त्यांनी एका निर्वाचित पीएमला(नवाज शरीफ) सत्तेवरून खाली खेचले व थेट तुरुंगातपाठवले. त्यांना अशा एका चुकीसाठी देशोधडीला लावले,ज्यामुळे शरीफ यांना ‘सादिक आणि अमीन’ (इस्लामिकविचारधारेनुसार खरे विश्वासार्ह) मानले गेले नाही. यानंतर इम्रान यांनी लष्कराचा वापर करूननिवडणुकीवर डल्ला मारला आणि बहुमताचा आकडामिळवला. पण जेव्हा त्यांनी त्याच लष्कराच्या विरोधातभूमिका घेतली, तेव्हा लष्कराने नेहमीप्रमाणेच कारवाईकेली. जेव्हा एखादा निर्वाचित नेता लष्करासाठी‘डोकेदुखी’ ठरू लागतो, तेव्हा ते अशाच प्रकारे त्याचाकाटा काढतात. इम्रान यांनी आयएसआय प्रमुखांसह लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्येहस्तक्षेप करायला सुरुवात केली होती. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हा अधिकार नाही, हेच ते विसरले होते. त्यांना किती वर्षांची शिक्षा झाली आहे, यावर जरा नजरटाका. पंतप्रधानपदी असताना मिळालेल्या भेटवस्तू नलपवणे आणि कथित ‘अल-कादिर ट्रस्ट’घोटाळ्याप्रकरणी त्यांना अनुक्रमे 14 वर्षे, 3 वर्षे आणि 14वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षा अत्यंतभयानक वाटतात. जेव्हा इम्रान खान हे निर्वाचित नेत्यांचीस्वायत्तता आणि नागरी प्रशासनाचे वर्चस्व टिकवण्यासाठीलष्कराला आव्हान देणारे पहिले पाकिस्तानी नेते म्हणून पुढेआले, तेव्हा पाकिस्तानातील लाखो लोकांमध्ये उत्साहसंचारला होता. जनतेच्या पाठिंब्यावर इम्रान थेट लष्कराच्यामुख्यालयाशी दोन हात करत होते. पाकिस्तानच्या लष्करालापहिल्यांदाच अशा नेत्याकडून आव्हान मिळाले होते,ज्याच्या पाठीशी भक्कम जनसमर्थन होते. त्या वेळीपाकमधील एका विचारवंताने इशारा दिला होता की, “जरासंयम बाळगा, कॅसिनोमध्ये नेहमी त्याचा मालकच जिंकतो.” आतापर्यंत तरी तो ‘मालक’च जिंकत आहे. पण त्यांनाहीमाहीत आहे की, त्यांनी आतापर्यंत ज्या नेत्यांना संपवले,त्यांच्या तुलनेत इम्रान अधिक धाडसी आणि लोकप्रियआहेत. जर इम्रान कोणतीही तडजोड न करता तुरुंगातूनबाहेर आले, तर लष्करप्रमुख असीम मुनीर यांना तोच जुनामार्ग अवलंबावा लागेल - एक तर त्यांना पुन्हा तुरुंगातटाकावे लागेल किंवा हद्दपार करावे लागेल. इम्रान यांचास्वभाव आक्रमक आणि आत्मकेंद्रित आहे. माझ्यासारखेअनेक लोक त्यांना त्यांच्या क्रिकेटच्या दिवसांपासूनओळखतात. ते जेव्हा कट्टरपंथी इस्लामवादाकडे वळले,तेव्हा आम्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यांनी असेका केले, हे काही समजले नाही. काश्मीर प्रश्नावर त्यांचेआणि मुनीर यांचे विचार अगदी सारखेच आहेत. तरीहीयामुळे मुनीर यांच्या रोषापासून त्यांचा बचाव होऊ शकलानाही! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) या मुद्द्याचे ‘क्रिकेटीकरण’इम्रान खानच्या भविष्याचा प्रश्न आतापाकिस्तानच्या देशांतर्गत राजकारणातून बाहेरपडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मंचावरपोहोचला आहे. पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांनाया मुद्द्याचे ‘क्रिकेटीकरण’ अजिबात नकोहोते. पण आता क्रिकेटच्या 21 माजीकर्णधारांनी इम्रानला चांगली वागणूकदेण्याची मागणी केली आहे. यात भारताच्या 3माजी कर्णधारांचाही समावेश आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा विळखा! एका महिन्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाकडून तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
महाराष्ट्र
- मुंबई: मनसेच्या त्या गुंडांना त्वरित अटक झालीच पाहिजे; भाजप युवा मोर्चाचे नेते कृष्णराज महाडिक आक्रमक, पोलीस कारवाईची मागणी
- कोल्हापुर: बिबट्याचा थरारक हल्ला! भुदरगड तालुक्यात गुरे चरण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर झडप, एक जण गंभीर जखमी
- सांगली: चालकाला अचानक चक्कर आल्याने एसटी बस थेट चहाच्या टपरीवर धडकली; टळला मोठा अनर्थ, सर्व प्रवासी सुखरूप
- जालना: उपोषणाचा चौथा दिवस! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मळमळ अन् उलट्यांचा त्रास; वैद्यकीय तपासणीस स्पष्ट नकार
गुन्हा
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नवी दिल्ली: जग चौफेर संकटात, पण भारताची वेगाने प्रगती पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 'झूठ की गुंज' म्हणत टोला
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला





























Subscribe to my channel


