नवी मुंबई: अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि नवी मुंबई पोलिसांनी एका संयुक्त मोहिमेत मोठी कारवाई करत शहरातील अन्न सुरक्षेला काळीिमा फासणाऱ्या एका हाय-प्रोफाइल रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी परिसरातील 'साधना एंटरप्रायझेस' (Sadhana Enterprises) या कंपनीवर धाड टाकून उत्पादनांच्या मुदतीची तारीख (Expiry and Manufacturing Date) बदलणाऱ्या आणि काळ्या बाजारात बनावट किंवा एक्सपायरी माल विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान प्रशासनाने सुमारे ७५ लाख ५२ हजार रुपयांचा बेकायदा साठा जप्त केला आहे.
नेमके काय आहे प्रकरण? महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, २४ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत तुर्भे एमआयडीसी येथील 'साधना एंटरप्रायझेस'च्या गोडाऊनवर व कार्यालयावर अचानक छापा टाकण्यात आला. या तपासणीदरम्यान उघडकीस आले की, कंपनीकडून मॅगी (Maggi), लेज (Lay's), कुरकुरीत (Kurkure), फन फ्लिप (Fun Flips) यांसारख्या लोकप्रिय ब्रँडेड आणि पॅकेज्ड खाद्यपदार्थांच्या मुदत संपलेल्या पाकिटांवरून जुने स्टिकर्स व मॅन्युफॅक्चरिंग/एक्सपायरी डेट काढून टाकल्या जात होत्या. त्याऐवजी त्यावर नवीन बनावट तारीख आणि नवीन लेबल्स लावून हा निकृष्ट किंवा मुदत बाह्य झालेला माल पुन्हा ग्राहकांच्या माथी मारण्यासाठी किंवा निर्यातीसाठी बाजारात पाठवला जात होता.
८,४४२ हून अधिक कार्टन आणि १० निर्यातदार कंपन्या रडारवर: या धडक कारवाईत एफडीएच्या पथकाने तब्बल ८,४४२ कार्टन जप्त केले असून, त्यांची एकूण बाजारातील किंमत ७५ लाख २१ हजार २६९ रुपये इतकी आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ही कंपनी १० वेगवेगळ्या निर्यातदार कंपन्यांशी (Exporters) संधान बांधून हा गैरव्यवहार चालवत होती. अनेक परदेशी बाजारपेठांमध्ये किंवा देशांतर्गत भागात कमी किमतीत माल खपवण्यासाठी हा काळाबाजार सुरू होता. अन्न सुरक्षेचे नियम पायदळी तुडवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या कंपनीचा परवाना (License) एफडीए प्रशासनाकडून तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल: अशा प्रकारे पॅकेज्ड अन्नपदार्थांच्या पाकिटांवर फेरफार करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संबंधित कंपनीच्या मालकावर आणि इतर दोषींवर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ (Food Safety and Standards Act, 2006) तसेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार तुर्भे पोलीस ठाण्यात अधिकृतपणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे आणि हा माल कुठे-कुठे पुरवला जात होता, याचा सखोल तपास सध्या पोलीस व एफडीएचे अधिकारी करत आहेत.
शहर
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल

























Subscribe to my channel




