नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना सध्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात प्रवाशांना अवाजवी टॅक्सी भाडे, अत्यंत महागड्या खाद्यपदार्थांची विक्री आणि पुरेशा सुविधांचा अभाव यांसारख्या विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर प्रवाशांना घरी किंवा इच्छित स्थळी जाण्यासाठी कॅब किंवा टॅक्सी बुक करणे अत्यंत कठीण आणि खिशाला ताण देणारे ठरत आहे. प्रवाशांच्या मते, ओला (Ola) आणि उबेर (Uber) सारख्या लोकप्रिय कॅब कंपन्यांच्या एन्ट्री-लेव्हल किंवा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या गाड्या विमानतळ परिसरात सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव महागड्या प्रायव्हेट किंवा प्रीमियम गाड्या बुक कराव्या लागतात. काही प्रवाशांनी नमूद केल्याप्रमाणे, विमानतळावरून मुलुंड, कोलाबा किंवा इतर उपनगरांमध्ये जाण्यासाठी तब्बल १,२०० ते २,००० रुपयांपर्यंतचे अवाढव्य भाडे आकारले जात आहे, जे इतर ठिकाणांच्या तुलनेत दुप्पट किंवा तिप्पट आहे. विमानतळ प्रशासनाच्या पार्किंग शुल्क आणि इतर कारणांमुळे स्थानिक टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
फक्त टॅक्सी भाडेच नव्हे, तर विमानतळ परिसरामध्ये मिळणारे अन्न आणि इतर खाद्यपदार्थांचे दर देखील गगनाला भिडले आहेत. विमानतळावर उतरल्यानंतर किंवा उड्डाणाची प्रतीक्षा करताना प्रवाशांना भूक लागल्यास साधा चहा, कॉफी किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू घेण्यासाठी तिप्पट-चोपटी किंमत मोजावी लागत आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला याचा मोठा फटका बसत आहे. याशिवाय विमानतळावर अजूनही अनेक मूलभूत सुविधांचा मोठा अभाव जाणवत आहे. रात्रीच्या वेळी किंवा गर्दीच्या वेळेस प्रवाशांना वाहन मिळवण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. प्रवाशांना योग्य ती मदत मिळण्यासाठी विमानतळावरील ग्राउंड स्टाफ देखील अपुरा किंवा गोंधळलेला असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. सार्वजनिक वाहतूक आणि बस सेवांची पुरेशी व नियमित कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे प्रवाशांची पायपीट होत आहे.
विमानतळासारख्या महत्त्वाच्या आणि भव्य प्रकल्पावरून प्रवास करताना प्रवाशांना होणाऱ्या या गैरसोयीमुळे नागरिकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी पसरली आहे. विमानतळ प्रशासनाने तातडीने या बाबींची गंभीर दखल घेऊन टॅक्सीच्या जादा दरांवर नियंत्रण आणावे, खाद्यपदार्थांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवावेत आणि सार्वजनिक वाहतूक व इतर सुविधा तातडीने सुरळीत कराव्यात, अशी जोरदार मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.
शहर
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल

























Subscribe to my channel




