ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक, लाजिरवाणी आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. शहापूर तालुक्यातील टेंभा गावाच्या हद्दीत असलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या तब्बल २१ अल्पवयीन विद्यार्थिनींचा एका कर्मचाऱ्याकडून लैंगिक विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत ५९ वर्षीय नराधम कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात विद्यार्थिनींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून ती दडपण्याचा गंभीर प्रयत्न केल्याचा ठपका शाळेच्या अधीक्षिकेवरही ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, टेंभे येथील या शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये दुर्गम भागातील सुमारे पावणेचारशे विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेच्या परिसरातच वसतिगृहाची सोय आहे. येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी संबंधित कर्मचाऱ्याच्या विरोधात अयोग्य वर्तणूक आणि विनयभंगाची तक्रार केली होती. मात्र, ही तक्रार वरिष्ठांपर्यंत पोहोचवून कारवाई करण्याऐवजी शाळेच्या अधीक्षिकेने ती दडपण्याचा प्रयत्न केला. हिंमत न हारता एका पीडित विद्यार्थिनीने याबाबत इतर मैत्रिणींना सांगताच एकापाठोपाठ एक अशा तब्बल २१ विद्यार्थिनींनी त्या नराधम कर्मचाऱ्याच्या विकृत कृत्याची पोलखोल केली. या धक्कादायक खुलाशाने शाळेत आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली.
गणपत झिपरू गवळी (वय ५९, रा. टेंभा, ता. शहापूर) असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपी कर्मचाऱ्याचे नाव आहे. यापूर्वीही दीड ते दोन वर्षांपूर्वी अघई येथील आश्रमशाळेत असताना गवळी याच्यावर अशाच प्रकारे एका विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा गंभीर आरोप झाला होता, त्यावेळीही त्याला निलंबित करण्यात आले होते. असे असतानाही पुन्हा अशाच विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीला शाळेत कामावर कसे ठेवले, असा संतप्त सवाल पालकांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
शहर
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
- मुंबई: आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न; अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याच्या नोटीसवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर घणाघात!
- पुणे: पद हवंय, आधी कामाचं रिपोर्ट कार्ड दाखवा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पुण्यातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची कानउघडणी!
महाराष्ट्र
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
- रत्नागिरी: कोंबड्यांच्या खोलीत रात्रभर राहिला बिबट्या; सर्व कोंबड्या फस्त करत दरवाजा उघडणाऱ्या महिलेवर केला हल्ला!
- गोवा: कुल-मुंडकार प्रकरणांबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; १९ डिसेंबरपर्यंत सर्व प्रकरणांची होणार सोडवणूक!
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर



























Subscribe to my channel




