पुणे: हडपसर परिसरातून एक मन हेलावून टाकणारी आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेम हे आंधळं असतं आणि एकदा प्रेमात पडल्यावर समोरच्या व्यक्तीच्या सुख-दुःखात कायम साथ देण्याचं वचन एकमेकांना दिलं जातं. मात्र, प्रेयसीच्या आजारपणाबद्दल समजताच पुण्यातील एका नराधम प्रियकराने आपले खरे आणि भयानक रंग दाखवले. आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे गोड आश्वासन दिले, मात्र जेव्हा प्रेयसीला गंभीर आजार झाल्याचे समजले, तेव्हा त्याने थेट तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. या टोकाच्या मानसिक छळाला आणि सततच्या अपमानाला कंटाळून अखेर एका १९ वर्षीय तरुण मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःच्या आयुष्याचा अंत केला.
पूजा बाबासाहेब नागरगोजे (वय १९, रा. माळवाडी, हडपसर, पुणे) असे आत्महत्या करणाऱ्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिच्या प्रियकराला हडपसर पोलिसांनी अत्यंत वेगाने कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव अतुल महादेव तांबे (वय २१, रा. केळी मार्केट, मार्केटयार्ड, पुणे) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत पूजा आणि आरोपी अतुल यांच्यामध्ये मागील काही काळापासून प्रेमसंबंध सुरू होते. अतुलने तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. सर्वकाही सुरळीत सुरू असताना, पूजाला एका आजाराचे निदान झाल्याचे व तिला त्या आजाराबद्दलची माहिती अतुलला समजली. प्रेयसीला आजार झाल्याचे कळताच आरोपी अतुलचे वर्तन पूर्णपणे बदलले. त्याने माणुसकी सोडत पूजाच्या चारित्र्यावर अतिशय गंभीर, बिनबुडाचे आणि अत्यंत अपमानास्पद संशय घेण्यास सुरुवात केली.
प्रेयसी आजारी असताना तिला आधार देण्याऐवजी त्याने तिच्यावर मानसिक अत्याचार सुरू केले. एवढेच नव्हे तर लग्नास साफ नकार देत तिला सतत मानसिक त्रास दिला. प्रियकराच्या या अचानक बदललेल्या क्रूर स्वभावाने आणि लागोपाठ झालेल्या तीव्र मानसिक छळाने तरुण पूजा पूर्णपणे खचली. तिला यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसला नाही आणि शेवटी या असह्य वेदना सहन न झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांची धडक कारवाई
या काळीज पिळवटून टाकणाऱ्या आणि कुटुंबाला उद्ध्वस्त करणाऱ्या घटनेची माहिती मिळताच पीडित तरुणीचे वडील बाबासाहेब वामन नागरगोजे (वय ५९, रा. स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) यांनी तात्काळ हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात हकीकत सांगत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखत तातडीने तपास चक्र वेगाने चालवली. मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी (Abetment to Suicide) गुन्हा दाखल करत मुख्य आरोपी अतुल महादेव तांबे याला पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. हडपसर पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


