
Mumbai : दिग्गज नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाला कारणीभूत ठरलेल्या विमानाच्या दोन्ही रेकॉर्डरचे आगीमुळे नुकसान झाले आहे. दीर्घकाळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्याने रेकॉर्डरचे नुकसान झाल्याची माहिती मंगळवारी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली. ‘एएआयबी’ ही संस्था अपघाताची सविस्तर चौकशी करत आहे. या विमानातील माहितीच्या पुनर्प्राप्तीसाठी रेकॉर्डरचे उत्पादन करणाऱ्या देशांच्या प्रतिनिधींकडून मदत मागण्यात आली.
मंत्रालयाने काय सांगितलं?
लिअरजेट ४५ या विमानाचा २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळानजीक अपघात झाला. या अपघाताची चौकशी विमान (अपघात आणि घटनांचा तपास) नियम, २०१७ आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (आयसीएओ) परिशिष्ट १३ मधील आंतरराष्ट्रीय मानके आणि शिफारस केलेल्या पद्धतींनुसार काटेकोरपणे केली जात असल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे.
या आगीमध्ये रेकॉर्डरचे नुकसान झाले असलं, तरी एल ३- कम्युनिकेशन्स यांनी तयार केलेला डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर, विमान अपघात तपास संस्थेच्या प्रयोगशाळेत यशस्वीरीत्या डाउनलोड करण्यात आला. तर हनीवेल कंपनीने तयार केलेल्या कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डरची सध्या विस्तृत तांत्रिक तपासणी सुरू आहे.
ही चौकशी समावेशी, वस्तुनिष्ठ आणि पुराव्यांवर आधारित व्हावी यासाठी विमान अपघात तपास संस्था सर्व विहित तांत्रिक आणि प्रक्रियात्मक प्रोटोकॉलचे पालन करत आहे. संपूर्ण पारदर्शकतेसाठी संस्थेची वचनबद्धता कायम असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. या विमान अपघातात सुरक्षित राहिलेल्या विमानाच्या मागच्या भागातील डेटा रेकॉर्डर जळाला कसा, असे प्रश्न विविध माध्यमातून उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर विमान अपघात तपास संस्थेने सर्व संबंधित घटकांना कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क टाळावेत आणि प्रस्थापित कार्यपद्धतीनुसार चौकशी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडू द्यावी अशी विनंती मंत्रालयाने केली आहे.
प्रश्न आणि तज्ज्ञांचे म्हणणे...
डेटा रेकॉर्डर जळाल्याची माहिती समोर आल्यानंतर हा ब्लॅकबॉक्स जळू शकतो का, अशीही विचारणा होत आहे. कागदपत्रे जळाली नाहीत मात्र विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेला, तीव्र आगीमध्ये सुरक्षित राहू शकणारा हा रेकॉर्डर कसा जळू शकतो असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. विमानाच्या मागच्या बाजूलाच रेकॉर्डर (ब्लॅकबॉक्स) सुरक्षित पद्धतीने राहील अशी रचना केलेली असते. आजूबाजूचे तापमान ७०० ते ८०० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले तरी ब्लॅकबॉक्सचे नुकसान होत नाही, असे तज्ज्ञ सांगत आहेत.
आतला भाग सुरक्षित असू शकतो
याआधी, मंगळुरु येथे झालेल्या अपघाताच्या वेळी प्रयत्नपूर्वक डेटा मिळविण्यात आला होता. रेकॉर्डरमधून डेटा डाऊनलोड करण्याचे पर्याय आपल्याकडे आहेत. काही वेळा त्यातील चीपचेही नुकसान होते. मंगळुरु अपघातात हेच घडले होते. त्यावेळी अमेरिकेच्या मदतीने सगळी माहिती प्राप्त करण्यात आली होती. या रेकॉर्डरचा बाहेरचा भाग खराब झालेला असला तरी यातील आतला भाग सुरक्षित असू शकतो, अशी माहिती एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी दिली.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel




Maximize your earnings with top-tier offers—apply now!