पुणे: शेतकऱ्यांच्या दुःखात राजकारण नको! संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर दत्तात्रय भरणेंचा स्पष्ट इशारा"

पुणे: महाराष्ट्रात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच दुष्काळ जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचे सुमारे ९७ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, उरलेले काम अवघ्या दोन ते चार दिवसांत पूर्ण केले जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. या कठीण आणि संकटाच्या काळात राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जात आहेत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तथापि, याच मुद्द्यावरून महायुतीमधील नेत्यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना भरणे यांनी शिंदेसेनेचे आक्रमक आमदार संजय गायकवाड यांना कडक शब्दांत तंबी दिली आहे. सध्याचा काळ हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत दुःखाचा आणि कसोटीचा आहे. अशा संवेदनशील आणि बिकट परिस्थितीत कोणीही नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी राजकारण किंवा कोणतेही चुकीचे, वादग्रस्त भाष्य करणे कटाक्षने टाळले पाहिजे, असे स्पष्ट शब्दांत भरणे यांनी सुनावले. या संकटाच्या काळात सर्वांनी मिळून शेतकऱ्यांना धीर दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली असून ती मदत पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अलीकडेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना त्यांनी महायुतीचा पराभव अत्यंत नम्रपणे स्वीकारल्याचे सांगितले. या पराभवाचे खापर कोणा एका पक्षावर फोडण्यापेक्षा महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी एकत्र बसून आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप किंवा शिवसेना यापैकी कोणताही पक्ष कामात कमी पडला नाही, असे सांगत जनतेने दिलेला कौल सर्वमान्य असावा लागतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *