ज्येष्ठ पटकथा लेखक आणि अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंगळवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. 90 वर्षीय सलीम खान यांचा रक्तदाब अचानक वाढला होता, त्यामुळे मेंदूच्या उजव्या बाजूला अंतर्गत रक्तस्त्राव झाला. या कारणास्तव त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर बुधवारी सकाळी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली आहे. वडिलांना रुग्णालयात दाखल करताच सलमान खान लिलावतीमध्ये त्यांच्या भेटीला पोहोचला होता. मंगळवारी रात्री त्याला रुग्णालयातून बाहेर पडताना पाहिलं गेलं. हा व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यामध्ये सलमानच्या चेहऱ्यावरील चिंता स्पष्ट दिसत होती.
सलीम खान यांची भेट घेऊन तो रुग्णालयाबाहेर पडताना पापाराझींनी सलमानला घेरलं. पापाराझी, फोटोग्राफर आणि सुरक्षारक्षक यांच्या गोंधळादरम्यान सलमान खूपच शांत होतं. परंतु त्याच्या चेहऱ्यावर काळजी, चिंता दिसून येत होती. व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान त्याच्या कारमध्ये डोळे बंद करून शांतपणे बसल्याचं पहायला मिळालं. जणू काही तो देवाकडे प्रार्थना करत होता, असं वाटत होतं. आणखी एका व्हिडीओमध्ये तो अत्यंत शांतपणे रुग्णालयातून बाहेर येताना दिसला. मंगळवारी सकाळी सलीम खान यांची अचानक प्रकृती बिघडली होती. त्यांचे कौटुंबिक डॉक्टर संदीप चोप्रा यांनी त्यांना लिलावती रुग्णालयातील आयसीयूमध्ये आणलं होतं.
दरम्यान मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन जारी करत सलीम खान यांची प्रकृती स्थिर असल्याचं स्पष्ट केलं. ते सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. टीममध्ये न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनय चव्हाण, कार्डिओलॉजिस्ट डॉ. अजित मेनन, न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि डॉ. बिनीत अहलुवालिया यांचा समावेश असल्याची माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली. सलमानसोबतच सलीम खान यांची पहिली पत्नी सलमा आणि दुसरी पत्नी हेलनदेखील रुग्णालयात पोहोचले होते. सोबत मुलगा अरबाज खान, मुली अलविरा आणि अर्पिता खान, जावई आयुष शर्मा, नातू निर्वाण आणि अरहान हे सर्वजण रुग्णालयात त्यांच्यासोबत होते. संजय दत्तसुद्धा रुग्णालयात पोहोचला होता.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




