मेघना पंत यांचा कॉलम:पुरुषांच्या निर्णयांचे खापर आपण किती काळ स्त्रियांवरच फोडणार?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎नुकतीच एक घटना घडली. अभिनेत्री तृषा ही‎तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या स्वातंत्र्यदिन‎सोहळ्यात दिसली. त्यानंतर मोठे वादळ उठले. तृषा तिथे‎एका प्रमुख जागी बसली होती. विजय यांच्या कुटुंबाशी‎संवाद साधत होती. मग काय, राजकीय टोलेबाजी,‎सोशल मीडियावर तर्कवितर्क व साहजिकच त्यांच्या‎नात्याबद्दलच्या चर्चांचा पूर येणे अटळ होते.‎ पण या सगळ्यात सर्वात आधी एकच प्रश्न विचारला‎पाहिजे : दरवेळी अशा कुठल्याही कथेत स्त्रीच आरोपी‎का ठरते? ‘दुसरी स्त्री’ ही आपल्या समाजातील सर्वात‎जुनी आणि कायम राहिलेली एक खलनायिका आहे. ती‎पुरुषाला भुलवते, घर मोडते, प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे‎आणि अधिकार नाही तिथे ती घुसखोरी करते; याच‎नजरेने तिच्याकडे पाहिले जाते. तिने काय परिधान केले‎आहे, ती कुठे बसली आहे, तिने कोणाला नमस्कार केला‎आणि ती किती आपुलकीने हसली—या प्रत्येक गोष्टीचे‎बारकाईने परीक्षण केले जाते. तर दुसरीकडे या कथेच्या‎केंद्रस्थानी असलेला पुरुष मात्र अगदी ‘निष्क्रिय''‎दाखवला जातो; जणू काही त्याच्या सभोवतालच्या गोष्टी‎आपोआपच घडत आहेत! हा कोणाच्या वैयक्तिक‎आयुष्याचा बचाव नाही. विजय आणि तृषा यांच्या खाजगी‎आयुष्यातील सत्य शोधणे हे आपले काम नाही. पण‎सार्वजनिक चर्चा किती सहजतेने सर्व नैतिक जबाबदारी‎स्त्रीवर ढकलतात आणि पुरुषाच्या भूमिकेकडे पूर्णपणे‎दुर्लक्ष करतात, यावर हे भाष्य नक्कीच आहे. एखाद्या‎शक्तिशाली पदावर असलेला पुरुष एखाद्या स्त्रीला‎आमंत्रित करतो, तिला सोहळ्यात सहभागी करून घेतो.‎तिच्याशी मैत्री करतो किंवा संवाद ठेवतो, तर तो त्याचा‎स्वतःचा निर्णय असतो. त्यांच्यात कोणतेही नाते असेल,‎तर या कथानकात पुरुष काही असहाय पात्राच्या भूमिकेत‎नाही. तो एक सज्ञान व्यक्ती आहे. पण पुरुषसत्ताक‎व्यवस्था स्त्रियांनाच एकमेकांविरुद्ध उभे करणे सोपे मानत‎आली आहे. कदाचित म्हणूनच आजची महत्त्वाकांक्षी‎स्त्री आपल्याला अस्वस्थ करते. आकर्षक स्त्री आपल्या‎मनात संशय निर्माण करते. आपल्याला आजही स्त्रिया या‎मर्यादेत राहणाऱ्या, लाजाळू, नैतिकतेची खात्री देणाऱ्या‎स्वरूपातच आवडतात. पण त्या सुंदर, यशस्वी, सत्तेच्या‎जवळ असतील तर आपण त्यांना दोषी ठरवण्यासाठी‎पुरावे शोधू लागतो. आपण पुरुषांच्या निर्णयांवर प्रखरतेने‎प्रश्न का विचारत नाही? प्रभावशाली पुरुषांना त्यांच्या‎वैयक्तिक किंवा व्यावसायिक नात्यांमध्ये निष्पाप किंवा ‘‎पॅसिव्ह ’ दाखवणे हा केवळ लैंगिक भेदभाव नाही, तर‎अत्यंत हास्यास्पद प्रकार आहे. अनेक शतकांपासून स्त्रिया‎पुरुषांच्या निर्णयांचे परिणाम भोगत आल्या आहेत.‎पत्नीकडून संसार टिकवण्याची अपेक्षा केली जाते,‎आईकडून कुटुंब एकत्र ठेवण्याची, मुलीकडून घराची‎‘प्रतिष्ठा’ जपण्याची आणि ‘दुसऱ्या स्त्रीकडून’ सर्व‎दोषांचे खापर स्वतःच्या डोक्यावर घेण्याची अपेक्षा केली‎जाते. बहुधा आता ही पारंपरिक पटकथा बदलण्याची वेळ‎आली आहे. या प्रकरणात स्त्रीवादी दृष्टिकोनाचा प्रश्न‎अत्यंत सरळ आणि सोपा आहे : पुरुषांच्या निर्णयांची‎नैतिक जबाबदार स्त्रीला मानणे आपण कधी थांबवणार?‎आपण हे थांबवणार नाही, तोपर्यंत प्रत्येक तथाकथित‎‘दुसऱ्या स्त्रीला’ जनमताच्या न्यायालयात आरोपीच्या‎पिंजऱ्यात उभे केले जाईल—आणि पुरुष मात्र अत्यंत‎आरामात दोषांच्या चौकटीबाहेर निसटून जाईल!‎ (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *