मुंबई शहरात झपाट्याने वाढणारे प्रदूषण, हवेचा ढासळता दर्जा आणि विशेषतः बांधकामांच्या ठिकाणांहून होणाऱ्या ध्वनी व वायू प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) महानगरपालिका (BMC) आणि इतर यंत्रणांना अत्यंत कडक शब्दांत फटकारले आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी कायदेशीर कारवाई करणे किंवा नियमांची अंमलबजावणी करणे हा प्रशासनाचा उपकार किंवा 'दान' नसून त्यांचे मूळ कर्तव्य आहे, अशी स्पष्ट शब्दांतील समज न्यायालयाने सुनावली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत महेंद्र सेठना यांच्या खंडपीठासमोर मुंबईतील एका गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पाच्या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामामुळे होणाऱ्या प्रचंड ध्वनी आणि वायू प्रदूषणाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
न्यायालयाचे कडक निर्देश आणि महत्त्वाचे निरीक्षण:
१. अंमलबजावणी कागदावर नको, प्रत्यक्षात हवी: प्रशासनाकडून केवळ नोटिसा बजावल्या जातात किंवा कागदावर सोपस्कार पार पाडले जातात, मात्र प्रत्यक्षात ग्राउंडवर कोणतीही प्रभावी कारवाई दिसत नाही, असे ताशेरे न्यायालयाने ओढले. २. ही केवळ मेहरबानी नाही, तर कर्तव्य आहे: न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की, "आम्ही महापालिकेला नियमांचे पालन करण्यास सांगत आहोत, याचा अर्थ ते काही आमच्यावर उपकार करत नाहीत किंवा कोणतीही चॅरिटी (दान) करत नाही, तर नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हे त्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे." ३. झोननुसार विभागणी आणि नियमित मॉनिटरिंग: संपूर्ण मुंबईत केवळ एकाच इमारतीवर कारवाई करून चालणार नाही, तर प्रत्येक विभागाची (Zones) पुनर्विकासाच्या आणि बांधकामाच्या दृष्टिकोनातून विभागणी केली जावी. प्रत्येक झोनसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांनी प्रदूषण नियमांचे पालन होते किंवा नाही, याची खात्री करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. ४. सख्त अटी व प्रतिज्ञापत्र: जोपर्यंत प्रकल्पाच्या ठिकाणी ध्वनी आणि वायू प्रदूषणाची मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) पाळली जाण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र व हमीपत्र संबंधित विकसक (Developer) देत नाही, तोपर्यंत कोणत्याही नवीन बांधकामास परवानगी दिली जाऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच विहित मर्यादा ओलांडणाऱ्या प्रकल्पांचे काम तातडीने थांबवण्यात यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अदालतीने स्पष्ट केले की, आमचा उद्देश संपूर्ण बांधकाम व्यवसाय किंवा पुनर्विकास रोखण्याचा नाही, परंतु नागरिकांच्या मूलभूत आणि आरोग्यदायी वातावरणात जगण्याच्या अधिकाराशी तडजोड केली जाणार नाही. प्रदूषण नियंत्रण उपायांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी उच्च न्यायालय दर तिसऱ्या आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी घेणार असून, सुधारणा न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही न्यायालयाने भरला आहे.
शहर
- मुंबई: गेली १२ वर्षे माझा शपथविधी होतोय, माझ्यावर अन्याय करू नका; मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची सडेतोड प्रतिक्रिया!
- पुणे: स्पर्म टेस्टमध्ये शून्य आढळल्यास पितृत्व अजूनही शक्य आहे का? मायक्रो-टीईएसई (Micro-TESE) देत आहे नवी आशा!
- पुणे: नागरिकांनी रॅपिडो सेवेचा वापर करू नये, पुणे आरटीओचे आवाहन; कंपनीवर गुन्हा दाखल आणि ॲप बंद करण्याची प्रक्रिया सुरू!
- पुणे: बारामती परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर! पोलिसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुप्रिया सुळे
महाराष्ट्र
- जळगाव: पाटील कुटुंबातील ६ जणांना कालव्यात फेकलं; तिघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता आणि १३ वर्षीय मुलाने सांगितला थरार!
- मुंबई: गेली १२ वर्षे माझा शपथविधी होतोय, माझ्यावर अन्याय करू नका; मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची सडेतोड प्रतिक्रिया!
- पुणे: स्पर्म टेस्टमध्ये शून्य आढळल्यास पितृत्व अजूनही शक्य आहे का? मायक्रो-टीईएसई (Micro-TESE) देत आहे नवी आशा!
- सातारा: यशवंतरावांच्या विचारांतूनच अजितदादांची कार्यपरंपरा पुढे नेवू; कराड प्रीतिसंगमावर सुनेत्रा पवारांची भावनिक व ठाम ग्वाही!
गुन्हा
- जळगाव: पाटील कुटुंबातील ६ जणांना कालव्यात फेकलं; तिघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता आणि १३ वर्षीय मुलाने सांगितला थरार!
- ठाणे: शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; भिवंडी महापालिकेकडून संबंधित दुकान सील व टपरी जप्त, पोलिसांत गुन्हा दाखल!
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!


























Subscribe to my channel




