नवी मुंबई: अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) राज्य आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार राज्यभरात भेसळखोरांविरोधात जोरदार मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत नवी मुंबईतील महापे एमआयडीसी (Mahape MIDC) परिसरात सुरू असलेल्या एका अत्यंत मोठ्या आणि धोकादायक दूध भेसळ रॅकेटचा एफडीएच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान एकूण ४,७१० लिटर भेसळयुक्त आणि संशयित दूध जप्त करून सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी जागेवरच नष्ट करण्यात आले आहे.
भेसळीची धक्कादायक पद्धत आणि रंगेहाथ कारवाई
गुप्त माहितीच्या आधारे ठाणे एफडीएच्या पथकाने महापे येथील मे. पी. के. डेअरी (Me. P. K. Dairy) वर छापा टाकला. छापा टाकला असता, डेअरीच्या आवारात 'MH 04 KU 1634' क्रमांकाचा आयशर दूध टँकर उभा असल्याचे आढळले.
तपासात उघड झाले की, डेअरी मालक प्रदीप कमलेश यादव याच्या संगनमताने शिवेंद्र श्यामलाल जैस्वाल (वय ३४) हा दुधाची पाकिटे फोडून त्यामध्ये स्किम्ड मिल्क पावडर (SMP) आणि चिलरच्या थंड पाण्याचे मिश्रण टँकरमध्ये ओतत होता. १ किलो स्किम्ड मिल्क पावडरमध्ये तब्बल ८ ते १० लिटर थंड पाणी मिसळून ते प्लंजरच्या साहाय्याने एकजीव केले जात होते. हे बनावट आणि भेसळयुक्त दूध शुद्ध गायी-म्हशीचे दूध असल्याचे भासवून नवी मुंबई, ठाणे, ऐरोली, घणसोली, दिघा आणि कोपरी परिसरातील विविध डेअऱ्यांना विकले जात होते.
१५ व्यक्ती व संस्थांवर एफआयआर (FIR) दाखल
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत तुर्भे पोलीस ठाण्यात १५ व्यक्ती आणि संबंधित डेअऱ्यांविरुद्ध प्रथम खबर अहवाल (FIR) दाखल करण्यात आला असून परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
गुन्ह्यात समाविष्ट असणाऱ्या डेअऱ्या व व्यक्ती:
-
शिवेंद्र श्यामलाल जैस्वाल
-
प्रदीप कमलेश यादव (मे. पी. के. डेअरी)
-
भास्कर संतु पिलानी (मे. भास्कर डेअरी, महापे)
-
मे. महाराज डेअरी (ऐरोली)
-
मे. विजय डेअरी (घणसोली)
-
मे. शिवकैलास डेअरी (ऐरोली)
-
मे. रूपसागर डेअरी (ऐरोली)
-
मे. दिनेश डेअरी (ऐरोली)
-
मे. बालाजी डेअरी (ऐरोली)
-
मे. शुक्लम् डेअरी (दिघा)
-
मे. श्रीराम डेअरी (कोपरी, ठाणे)
-
मे. वासुदेव डेअरी (कोपरी, ठाणे)
-
मे. राधाकृष्ण डेअरी (कोपरी, ठाणे)
-
मे. जनम डेअरी (साकेत, ठाणे)
-
मे. देवनारायण डेअरी (आझाद नगर, ब्रह्मांड, ठाणे)
लाखो रुपयांचा साठा जप्त आणि नष्ट
अन्न सुरक्षा परवाना नसल्यामुळे मे. पी. के. डेअरीचा व्यवसाय तात्काळ बंद करण्यात आला. एफडीएने राबवलेल्या संपूर्ण मोहिमेत पुढील साहित्य व साठा जप्त/नष्ट करण्यात आला:
-
भेसळयुक्त व संशयित दूध: ४,७१० लिटर (किंमत ₹१,८५,७८०) – नष्ट करण्यात आले.
-
स्किम्ड मिल्क पावडर (SMP): ४७३ किलो (किंमत ₹१,६०,८२०) – जप्त.
-
पनीर: १२९.५ किलो (किंमत ₹४५,२८०) – जप्त.
-
क्रीम: ८८.४ किलो (किंमत ₹३०,९४०) – जप्त.
-
इतर साठा: मे. नारायण डेअरी (रबाळे) येथून ३,६४८ लिटर पाश्चराईज्ड स्किम्ड दूध (किंमत ₹१,२४,०३२) नष्ट करण्यात आले.
प्रशासकीय पथक व नागरिकांना आवाहन
ही धडक कारवाई अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे, दक्षता विभागाच्या सह-आयुक्त प्रीती टिपरे, ठाण्याचे अन्न सह-आयुक्त सचिन जाधव, कोकण विभागाचे सह-आयुक्त अजित मैत्रे आणि अन्न सुरक्षा अधिकारी विक्रम निकम, प्रशांत पवार, उत्तरेश्वर बडे व माणिक जाधव यांच्या पथकाने केली.
एफडीएचे आवाहन: नागरिकांना दुधात किंवा कोणत्याही अन्नपदार्थात भेसळीचा संशय आल्यास प्रशासनाच्या १८०० २२२ ३६५ (1800 222 365) या टोल-फ्री क्रमांकावर तात्काळ तक्रार नोंदवावी.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




