
मुंबई : भाजपविरोधात समविचारी पक्षांची मोट बांधण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर देशभरातील स्वपक्षीय नेत्यांसह इतर समविचारी पक्षांची कोंडी झाली आहे.
पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी भूमिका देशभरातील भाजपविरोधी पक्षांची असून, जर त्यांना निर्णयावर ठाम रहायचे असेल, तर किमान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी निर्णय मागे घ्यावा अशी, या नेत्यांची भूमिका असल्याचे समजते.
शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर इतर राज्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी, एम. के. स्टॅलिन यांनीही पवारांशी संपर्क साधत विचारणा केल्याचे सांगण्यात येते. पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा अशीच भावना भाजपविरोधात देशपातळीवर काँग्रेससह जे जे पक्ष एकत्र येत आहेत त्या सर्व पक्षांच्या नेत्यांची आहे.
राष्ट्रवादीच्या केरळ, मेघालय, हरियाना, बिहार, गुजरात, मणिपूर, लक्षद्वीप, गुजरात, नागालँण्ड येथील प्रदेश नेत्यांनाही या निर्णयाचा धक्का बसला असून, राष्ट्रवादीच्या विविध राज्यांतील नेत्यांसोबत पवारांची उद्यापासून (ता.५) प्रत्यक्ष चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
समितीची आज बैठक
नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी शरद पवार यांनी नेमलेल्या समितीची शुक्रवारी सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी भवनमध्ये बैठक आहे. या समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे,
छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, एकनाथ खडसे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदापासून दूर जाऊ नये, यावर चर्चा होऊन ठराव होईल असे संकेत आहेत.
शहर
- पुणे: पुण्याच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा..! २१,८०० कोटींच्या मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
- पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २१,८०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण; विरोधकांवर कडाडून टीका करत साधला निशाणा
- मुंबई: महायुतीत मोठे वादंग! भ्रष्टाचाराचा आरोप करत मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, मिरा-भाईंदरमध्ये राजकीय संघर्ष पेटला
- पुणे: मध्य भागात दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी; वाहतूक नियोजन अन् चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
महाराष्ट्र
- कोल्हापूर: ऊसदरप्रश्नी 'स्वाभिमानी'चे पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन; किणी टोलनाक्यावर राजू शेट्टी दाखल, वाहतूक विस्कळीत
- पुणे: पुण्याच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा..! २१,८०० कोटींच्या मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
- पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २१,८०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण; विरोधकांवर कडाडून टीका करत साधला निशाणा
- मुंबई: महायुतीत मोठे वादंग! भ्रष्टाचाराचा आरोप करत मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, मिरा-भाईंदरमध्ये राजकीय संघर्ष पेटला
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी


























Subscribe to my channel




