महाड: स्वराज्याची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक दुर्गराज रायगड किल्ल्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही 'शिवराज्याभिषेक दिन सोहळा' अत्यंत उत्साहात साजरा केला जाणार आहे. तारखेनुसार ६ जून तर तिथीनुसार २६ जून रोजी होणाऱ्या या भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गडावर शिवभक्तांची आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आणि सुरक्षेचा भाग म्हणून रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गडावर जाणारा मुख्य पायरी मार्ग ३० आणि ३१ मे रोजी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
नेमके कारण काय? प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत गड-किल्ल्यांवर तटबंदी किंवा उंच कड्यांवरून दगड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. याची गंभीर दखल घेत यावर्षी कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना टाळण्यासाठी आधीच खबरदारी घेतली जात आहे. ३० आणि ३१ मे रोजी गडावरील धोकादायक आणि सैल झालेले दगड हटविण्याचे (Rock Scaling) काम मार्ग प्रकल्प विभाग, महाड आणि दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून केले जाणार आहे. हे काम सुरू असताना पायी ये-जा करणाऱ्या पर्यटकांना किंवा शिवभक्तांना दगड लागून मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे दोन दिवस पायरी मार्ग पूर्णपणे बंद असेल.
रोपवे सेवा नियमित सुरू राहणार पायरी मार्ग बंद असला तरी गडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे 'रायगड रोपवे' सेवा या दोन्ही दिवशी नियमित सुरू राहणार आहे. त्यामुळे ज्यांना गडावर जाणे आवश्यक आहे, ते रोपवेच्या माध्यमातून जाऊ शकतात.
जिल्हा प्रशासनाने मार्ग प्रकल्प विभाग आणि संबंधित संस्थांना सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी गडावर व पायरी मार्गाच्या परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तरी सर्व शिवभक्तांनी आणि पर्यटकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपल्या प्रवासाचे नियोजन या बदलाचा विचार करून करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




