
Pune : पुण्यात महिलांच्या सुरक्षितता, आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरणासाठी पुणे महानगरपालिकेने अनेक उपक्रम जाहीर केले आहेत. या उपक्रमांचा उद्देश आहे की महिलांना आत्मविश्वास येईल, स्वतःला सुरक्षित ठेवता येईल आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनता येईल. पुणे महापालिकेकडून सर्वप्रथम, स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहे. येथे महिलांना ज्युडो, कराटे, लाठी-काठी, योग आणि व्यायाम शिकवले जाईल. त्यामुळे महिलांना स्वतःला कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठेवण्याची क्षमता मिळेल.
महिला बचत गटांसाठी कौशल्य विकास आणि कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये महिलांना पैसे वाचवायला, व्यवसाय चालवायला आणि रोजगार मिळवायला मदत होईल. त्यामुळे महिलांचा आर्थिक स्वावलंबन वाढेल आणि त्यांना स्वतःच्या व्यवसायासाठी संधी मिळेल.
महिला सक्षमीकरणासाठी व्यवसाय प्रशिक्षण, दहावी-बारावीच्या विद्यार्थिनींसाठी खासगी क्लासेस, सीईटी परीक्षांसाठी आर्थिक सहाय्य, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी अनुदान, मुलगी दत्तक योजना, रमाई स्वावलंबन योजना, संजय गांधी निरा अनुदान योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना असे अनेक उपक्रम राबवले जातील. याशिवाय बचत गटांना निधी, स्वसंरक्षण वर्ग आणि योगासन वर्गही उपलब्ध असतील.
महिलांच्या मालकी हक्काला चालना देण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत ५०० चौ.फुटपर्यंतच्या संपत्तीस ५०% करमाफी देण्यात येणार आहे, जेणेकरून महिलांचा हक्क सुरक्षित राहील.महिला उद्योजक, बचत गट आणि सामाजिक संस्था यांच्यासाठी कन्व्हेन्शन सेंटर उभारले जाईल, जिथे प्रशिक्षण, परिषद, प्रदर्शन आणि संवाद कार्यक्रम आयोजित केले जातील.शाळांमध्ये किशोरवयीन मुलींसाठी पिंक रूम तयार केली जाईल, जिथे त्यांना शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक मार्गदर्शन मिळेल.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी १०० मोफत स्वच्छतागृह उभारले जातील, जे स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज असतील.
तसेच, राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना अंतर्गत महिलांना कौटुंबिक सल्ला, कायदे मार्गदर्शन आणि मानसिक-सामाजिक मदत मिळेल.
या सर्व उपक्रमांमुळे पुण्यातील महिलांना सशक्त बनवता येईल, त्यांचा समाजात सहभाग वाढेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल असे सांगण्यात येत आहे. शहरातील वाढते महिलांवरील अत्याचार हे या योजणांमुळे कमी होणार का? शहरातील महिला पूर्णतः सक्षम बनणार का? याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel





Your audience, your profits—become an affiliate today!