
Pune : शहरातील ट्रॅव्हल एजन्सी आणि एजंटना आता प्रत्येक ग्राहकाची माहिती आणि त्यांच्या व्यवहाराचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. पर्यटनाच्या आकर्षक जाहिरातींद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या घटना टाळणे, पर्यटनस्थळी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पुणेकर प्रवाशांची माहिती सहज उपलब्ध होऊन मदत कार्य तातडीने सुरू करणे आणि दहशतवादी घटनांपासून पर्यटन क्षेत्राचे रक्षण करणे हा या मागील उद्देश आहे.
पहिल्यांदाच अशा प्रकारे ट्रॅव्हल एजन्सीसाठी पोलिसांनी नियमावली लागू केली आहे. पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि दिल्ली येथे लाल किल्ल्याबाहेरील बॉम्बस्फोटाच्या पाश्र्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सावध झाली आहे. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर विश्रामबाग पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील ट्रॅव्हल एजन्सींसाठी खास सुरक्षा नियम आखून दिले आहेत. बुधवारी (१० डिसेंबर) यासंबंधी विश्रामबाग पोलिस ठाण्यात बैठक झाली.
|
Pune : 17 वर्षीय मुलीचा मृत्यू; शेवटच्या चिठ्ठीत ‘बापामुळे…’ धक्कादायक उलगडा |
पोलिसांनी ग्राहक नोंदी, कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी आणि CCTV व्यवस्थापन यावर विशेष लक्ष ठेवण्याचा आदेश दिला आहे. प्रत्येक ट्रॅव्हल एजन्सीचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक पोलिस ठाण्यात नोंदवावा. एजन्सी चालवण्यासाठी संबंधित विभागाचे परवाने छायांकित सादर करणे. एजन्सीतील सर्व कर्मचाऱ्यांची पात्रता व पार्श्वभूमी तपासून छायांकित प्रत पोलिस ठाण्याला सादर करावी. संशयास्पद ग्राहक किंवा हालचाली दिसल्यास त्वरित पोलिस ठाण्याला संपर्क साधावा, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.
ट्रॅव्हल एजन्सी प्रत्येक ग्राहकाची नोंद ठेवतात. मात्र, काही जण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे ग्राहकांचे आधार, पॅन, मतदार कार्ड इत्यादी ओळखपत्रे तपासून नोंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ग्राहकांकडून येणारे पेमेंट पूर्णतः ऑनलाइन घेतले जावे; जेणेकरून बँक तपशिलांद्वारे आवश्यकतेनुसार तपास करता येऊ शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे. ट्रॅव्हल एजन्सीच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि ६० दिवसांचा बॅकअप राखणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नियमावलीचा उद्देश पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवणे आणि दहशतवादी घटनांचा संभाव्य धोका टाळणे हा आहे. अनेक ठिकाणी पर्यटक अडकतात, त्या वेळी पुण्यातील पर्यटक सुखरूप आहेत का, याबाबत पोलिसांना तातडीने माहिती मिळत नाही. पर्यटकांची माहिती नोंद असल्यास संबंधित एजन्सी पोलिसांना तातडीने त्याबाबत कळवू शकते, असं विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रसाद कसबे यांनी म्हटलं आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



