
Pune : पुणे जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून एका आईनेच आपल्या सहा वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांनी निर्दयी आईला अटक केली असून तिचा प्रियकर सध्या फरार आहे.
मृत मुलाचे नाव आवेज मेहबूब शेख (वय ६) असे आहे. पोलिसांनी या प्रकरणी आई बसरीन मेहबूब शेख (वय २७, रा. कुरुळी) हिला अटक केली आहे. तर, तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड हा अद्याप पसार असून त्याचा शोध सुरू आहे.
बाथरूममध्ये नेऊन गळा दाबून हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, बसरीन आणि तिचा प्रियकर राम यांच्या प्रेमसंबंधात लहानगा आवेज अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघांनी मिळून त्याला संपवण्याचा कट रचला. त्यांनी मुलाला बाथरूममध्ये नेले आणि त्याचा छळ करत गळा दाबून त्याची हत्या केली. या घटनेने माणुसकीलाच काळिमा फासला आहे.
मृत्यूचा बनाव करण्याचा प्रयत्न
हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी आवेजचा मृतदेह ‘इर्टिका’ कारमधून बीड जिल्ह्यातील धर्मापुरी येथे नेला. तिथे मुलाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मुलाच्या मृत्यूबाबत संशय आल्याने इसाक शेख यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
चौकशीत गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी बसरीनला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. फरार आरोपी राम कजेवाड याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे कुरुळी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एका निष्पाप मुलाचा त्याच्याच आईने जीव घेतल्याने नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहर
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
- वन विभागाची एक चूक अन् बिबट्या निसटला! आजरा परिसरात थरार कायम, नागरिकांनी रात्री बाहेर पडताना सावधान राहावे
- कोल्हापूर: विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा मोठा भांडाफोड! ७१ ग्रॅम हशीश जप्त; विमानतळ कर्मचारी अटकेत
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
- वन विभागाची एक चूक अन् बिबट्या निसटला! आजरा परिसरात थरार कायम, नागरिकांनी रात्री बाहेर पडताना सावधान राहावे
- कोल्हापूर: विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा मोठा भांडाफोड! ७१ ग्रॅम हशीश जप्त; विमानतळ कर्मचारी अटकेत
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट
























Subscribe to my channel




