
Pune : पुण्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बास्केटबॉल पोस्टवरील रिंग डोक्यावर कोसळल्याने 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी विशाल वर्मा याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तो बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता.
रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल बास्केटबॉलच्या मैदानातून जात असताना त्याने पोस्टवरील रिंगला हात लावला. त्यावेळी रिंग अचानक खाली कोसळली आणि अवजड लोखंडी भाग थेट त्याच्या डोक्यावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
घटनेनंतर काही वेळ विशाल बेशुद्ध अवस्थेतच पडून होता. त्याला रुग्णालयात नेण्यास विलंब झाल्याचा आरोप सहविद्यार्थ्यांनी केला आहे. तळेगावमधील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विशाल हा उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील रहिवासी असून तो पुण्यातील कॉलेजच्या वसतिगृहात राहत होता. घटनेची माहिती मिळताच त्याचे पालक पुण्यात दाखल झाले.
या घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.
दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाने वेगळा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, विशाल बास्केटबॉलच्या रिंगला लटकून व्यायाम करत होता. त्यावेळी पोस्ट त्याच्या वजनाचा भार सहन करू शकली नाही आणि ही दुर्घटना घडली.
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर यांनी सांगितले की, या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. तसेच, या घटनेत कुणाची हलगर्जीपणा आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे वर्मा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




