
Pune : पुण्याच्या मावळ तालक्यातील पवना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये १८ वर्षांचा अद्वैत वर्मा काही दिवसांपूर्वी बुडून मृत्यूमुखी पडला. आता त्याच्या पालकांनी २३ जुलै रोजी राज्य सरकारविरोधात दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ कायद्याच्या कलम ८० नुसार खटला दाखल केला आहे. जेणेकरून इतर कुणाच्या मुलाचा मृत्यू होऊ नये. अद्वैत वर्मा हा मुळचा दिल्लीचा असून विमान नगर येथील सिम्बॉसिस महाविद्यालयात बीबीएच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. महाविद्यालयातील त्याच्या मित्रांसह तो पवना धरणावर सहलीसाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला.
पर्यटनस्थळी सूचना फलक असावेत
अद्वैत वर्माचे काका आणि दिल्लीस्थित असलेले वकील सुरेश वर्मा यांनी सांगितले की, पवना धरणाच्या बॅकवॉटरजवळ पर्यटकांना माहिती देणारे फलक लावलेले गेले नाहीत. तिथं जीवाला धोका आहे, असे कुठेही लिहिलेले नाही. त्यामुळे अशा लोकप्रिय पर्यटनस्थळी मुलांचा मृत्यू झाल्यास, फक्त मुलांना त्यासाठी दोष देणे चुकीचे आहे. २३ जुलै रोजी पुण्यातील स्थानिक वकील नितीन कांबळे यांच्यामार्फत राज्य सरकारला नोटीस पाठविण्यात आली आहे. निष्काळजीपणा आणि सुरक्षेचे योग्य उपाय न योजिल्याबद्दल सरकारला दोषी धरण्यात आले आहे. उपचारापेक्षा प्रतिबंध कधीही चांगला आणि ही सरकारची जबाबदारी आहे, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.
|
Pune Fire : पुण्यातील खराडी परिसरात सोफा कारखान्याला भीषण आग, परिसरात पसरले धुराचे लोट |
लोणावळ्याच्या नजीक पवना धरण आहे. इकडच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येतात. येथे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. नुकतेच जानेवारी महिन्यात २० वर्षीय मनीष शंकर शर्मा यांचा मृत्यू झाला. फेब्रुवारी महिन्यात २५ वर्षीय मयांक अखिलेश उपाध्याय, जूनमध्ये अद्वैत वर्मा आणि जुलैमध्ये सागर कैलास साठे यांचा याठिकाणी मृत्यू झाला आहे. या सर्वांचाच बुडून मृत्यू झाला.
अद्वैत वर्मा प्रकरणाचे वकील नितीन कांबळे यांनी म्हटले की, आमच्या नोटिशीला उत्तर देताना राज्य सरकार खुल्या जागी सुरक्षारक्षक तैनात करू शकत नाही, असे उत्तर कदाचित देऊ शकते. मात्र सुरक्षारक्षक तैनात नाही केले तरी अशा लोकप्रिय पर्यटन स्थळी जवळच्या पोलीस ठाण्यातून मदत पुरविली गेली पाहिजे. लाईफ जॅकेट, बोट आणि जीवरक्षक अशा परिसरात उपलब्ध केले पाहिजेत, अशी अपेक्षा नितीन कांबळे यांनी व्यक्त केली.
नुकसान भरपाई मागणार
वर्मा कुटुंबीयांनी आता राज्य सरकारकडून नुकसान भरपाई मागितली आहे. तसेच या विषयावर जागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. अद्वैत वर्माच्या पुण्यातील स्थानिक पालक असलेल्या मोनिका बुदकी यांनी म्हटले की, अद्वैत पवना धरणाजवळ सहलीसाठी जात आहे, हे मला माहीत असते तर मी त्याला तेथील धोक्याची माहिती दिली असती. मोनिका यांनी म्हटले की, अद्वैतच्या मित्रांनी सहलीची माहिती देताना सांगितले की, पाण्याची पातळी अचानक वाढली. कोणतीही आगाऊ सूचना न देता धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे पाण्याची पातळी अचानक वाढली. ज्यामुळे अद्वैत बुडाला.
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप




























Subscribe to my channel




