
पुणे - संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात १२ जून रोजी एकत्रित येत आहेत. या दोन्ही पालख्यांच्या आगमनामुळे शहरात रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालखी मार्ग आणि परिसरातील वाहतुकीमध्ये आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येणार आहेत. शहरातील काही मार्ग पहाटे दोन वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.
तसेच, पालखीदरम्यान मुंबई, सोलापूर आणि अहमदनगर दिशेने शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनांना बंदी राहील. पालखी पुढे जाईल, त्यानुसार वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करुन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
पालखी सोहळ्यातील काही वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पालखीचे ‘लाइव्ह लोकेशन’ कळणार असून, त्यानुसार वाहतूक नियंत्रित करण्यात मदत होणार आहे.
- पालखी सोहळ्यासाठी स्वतंत्र ॲप.
- सीसीटीव्हीद्वारे वाहतुकीवर ‘वॉच’
- दिंडीत अंतर पडल्यास रस्त्याच्या दोन्ही बाजूचे बॅरिकेड॒स किंवा रोप काढून वाहनांना मार्ग खुला करून देणार.
- पालखी मार्गावरील मेट्रोची कामे बंद ठेवण्यात येणार आहेत.
सुमारे एक हजार वाहतूक पोलिस तैनात
पालखी सोहळ्यादरम्यान शहरात वाहतूक नियमनासाठी पोलिस उपायुक्त, चार सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह ९७५ पोलिस निरीक्षक आणि कर्मचारी तैनात असतील, अशी माहिती पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.
संत तुकाराम महाराज पालखी आगमन मार्ग -
संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्ग : १२ जून रोजी रोजी विठ्ठल मंदिर आकुर्डी येथून निघून चिंचवड, पिंपरी, वल्लभनगर नाशिक फाटा, फुगेवाडी, दापोडी, हॅरिस ब्रिज, बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्टेशन, मरिआई गेट चौक, वाकडेवाडी पाटील इस्टेट चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक.
वाहतुकीसाठी बंद रस्ते आणि कंसात वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग -
-
बोपोडी चौक ते खडकी बाजार (अंतर्गत रस्त्याने चर्च चौक).
-
चर्च चौक (भाऊ पाटील रोड ब्रेमेन चौक औंधमार्गे).
-
पोल्ट्री फार्म चौक (रेल्वे पोलिस मुख्यालयासमोरून औंध रस्ता ब्रेमेन चौक).
-
मुळा रोड ते कमल नयन बजाज उद्यान चौक (अंतर्गत रस्त्याचा वापर करावा).
-
चर्च चौक ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक- जुना मुंबई-पुणे मार्गावरून पुण्याकडे येणारी सर्व वाहने बंद करण्यात येतील (बोपोडी चौकातून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी भाऊ पाटील रस्त्यावरून औंध रस्तामार्गे ब्रेमेन चौकातून इच्छितस्थळी जावे).
-
आर.टी.ओ. ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक (आरटीओ चौक - शाहीर अमर शेख चौक - कुंभार वेस चौक किंवा आरटीओ चौक- जहाँगीर चौक आंबेडकर सेतू ते गुंजनमार्गे).
-
सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट चौक (पर्णकुटी चौक-बंडगार्डन पूल-महात्मा गांधी चौकमार्गे).
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमन मार्ग -
श्री क्षेत्र आळंदी येथून पालखी १२ जून रोजी निघून वडमुखवाडी चऱ्होली फाटा, दिघी मॅगझीन, बोपखेल फाटा. बी.ई.जी. ट्रेनिंग बटालियन २, म्हस्के वस्ती कळस ओढा, विश्रांतवाडी, फुलेनगर, साप्रस चौकी, चंद्रमा चौक, डावीकडे वळून सादलबाबा चौक, उजवीकडे वळून संगमवाडी रस्त्याने पाटील इस्टेट चौक, डावीकडे वळून इंजिनिअरिंग कॉलेज चौक.
वाहतुकीसाठी बंद रस्ते आणि कंसात वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग -
-
कळस फाटा से बोपखेल फाटा, विश्रांतवाडी चौक (धानोरी आणि अंतर्गत रस्त्याने).
-
मेंटल हॉस्पिटल कॉर्नर ते आळंदी रोड जंक्शन (जेल रोड- विमानतळ रोड मार्ग).
-
सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट रस्ता (पर्णकुटी चौक -गुंजन चौक -जेल रोड- विश्रांतवाडी चौक).चंद्रमा चौक ते आळंदी रोड (अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा).
-
नवीन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक बंद. होळकर पूल ते चंद्रमा चौक आणि होळकर पूल ते साप्रस चौकी मार्ग बंद.
-
या कालावधीत फक्त आळंदीकडे जाणारे रस्ते बंद राहणार असून, इतर रस्ते वाहतुकीसाठी सुरू राहतील.
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे एकत्रित मार्ग -
पुणे-मुंबई रस्त्याने इंजिनिअरिंग कॉलेज चौक, संचेती चौक, सिमला ऑफीस चौक, वीर चाफेकर चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक, गुडलक चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्त्याने विजय टॉकीज चौक, सेवासदन चौक, बेलबाग चौक, बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिर, मोती चौक, सोन्या मारुती चौक, हमजेखान चौक, डुल्या मारुती चौक, नानापेठ पोलिस चौकी येथे आल्यानंतर संत तुकाराम महाराजाची पालखी अरुणा चौकमार्गे निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम करेल. तसेच, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अशोक चौकमार्गे पालखी विठोबा मंदिरात मुक्काम करेल. दुपारी १२ वाजल्यापासून आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.
वाहतुकीसाठी बंद रस्ते आणि कंसात वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग -
-
गणेश खिंड रस्ता- रेंजहिल चौक ते संचेती चौक- (रेंज हिल्स- खडकी पोलिस ठाणे अंडरपास- पोल्ट्री चौक- जुना मुंबई-पुणे महामार्ग किंवा रेंज हिल्स- सेनापती बापट रस्ता- नळ स्टॉप चौक).
-
फर्ग्युसन रस्ता- खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक (खंडोजीबाबा चौक- कर्वे रस्ता- सेनापती बापट रस्ता).
-
शिवाजी रस्ता- गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे मार्ग (गाडगीळ पुतळा - कुंभारवेस चौक-आरटीओ चौक).
-
वीर चाफेकर चौक ते वाकडेवाडी भुयारी मार्ग (पोल्ट्री फार्म चौक, रेंजहिल मार्ग किंवा औंध मार्ग).
-
मॉडर्न कॉलेज रस्ता- डेक्कन वाहतूक विभाग ते थोपटे पथ चौक (घोले रोड व आपटे रोड).
-
कुंभार वेस चौक ते गाडगीळ पुतळा चौक आणि मालधक्का ते शाहीर अमर शेख चौक (कुंभार वेस- पवळे चौक- फडके हौद चौक किंवा मालधक्का चौक- नरपतगीर चौक- १५ ऑगस्ट चौक - कमला नेहरू रुग्णालय).
-
- वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस १०० मीटरपर्यंत वाहने उभी करण्यास प्रतिबंध.
-
- अरूणा चौक ते पारशी अगेरी आणि पालखी विठोबा चौक ते बाबासाहेब किराड पथ जंक्शन या रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास व पार्किंग करण्यास बंदी.
पालखीच्या दिंड्यांसोबत येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग -
१२ जून रोजी आळंदीकडून विश्रांतवाडीपर्यंत येणाऱ्या वाहनांनी आळंदी-मरकळ - तुळापूर - फुलगाव - लोणीकंद - वाघोली- लोहगाव- येरवडा मार्गाचा वापर करावा.
- इंदिरानगर, दत्तमंदिरपासून मरिआई गेटकडे जाणाऱ्या वाहनांनी साप्रस चौकी जंक्शन-चंद्रमा चौक-सादलबाबा दर्गा- पर्णकुटी चौक या मार्गाचा वापर करावा.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




