Nashik News : अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारी गाडी जमावाने पेटवली

Nashik News : अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी ही कारवाई दुपारी केल्यानंतर रात्रीच्या सुमारास पुन्हा एक गाडी आढळून आल्याने अज्ञातांनीजनावरांची वाहतूक करणाऱ्या या गाडीलाच पेटवून दिले.

नाशिकच्या येवला तालूक्यात रात्रीच्या सुमारास अज्ञात तरुणांच्या जमावाने अवैध जनावरांची गाडी पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान २७ जानेवारीला दुपारच्या सुमारास गोवंशाची गाडी घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हा कारवाई झाली असतांनाच रात्रीच्या सुमारास पुन्हा अवैधरित्या गाडीतून जनावरे घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. यानंतर न्याहारखेडे शिवारत वळण बंधाऱ्याजवळ काही तरुणांच्या जमावाने पाठलाग करत गाडीतील गोवंश खाली उतरवत गाडीला  आग लावली.  

Manoj Jarange Patil : '...तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा!

गाडी संपूर्णपणे जळून खाक 

यात संपुर्ण गाडी जळून खाक झाली. याची माहिती येवला तालूका पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यापुर्वीच संपुर्ण गाडी जळून खाक झाली होती. जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून गाडी पेटविणाऱ्या तरुणांचा पोलिस शोध घेत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *