नागपूर, महाराष्ट्र:नागपूर येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीला प्रशासनाकडून बाहेर काढण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. आकांक्षा उके असे या विद्यार्थिनीचे नाव असून, तिने वसतिगृहातील असुविधांबाबत थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. याच तक्रारीचा सूड म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडित विद्यार्थिनीने केला आहे.
नेमके प्रकरण काय? उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि वसतिगृहात कूलरची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास, याबद्दल आकांक्षा उके हिने संबंधित प्रशासनाकडे वारंवार दाद मागितली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. अखेर वैतागलेल्या आकांक्षाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवून कूलरची सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचा राग वसतिगृह प्रशासनाला आल्याचे दिसते. तक्रार केल्यानंतर काही दिवसांतच, प्रशासनाने आकांक्षा उके हिला वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस बजावली. या नोटीसमुळे आकांक्षा आणि इतर विद्यार्थी वर्गात मोठा संताप निर्माण झाला आहे.
विद्यार्थिनीचा आरोप: आकांक्षा उके हिने असा आरोप केला आहे की, वसतिगृहातील मूलभूत सुविधांची मागणी करणे हा माझा हक्क होता. परंतु, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यामुळे सूडबुद्धीने माझ्यावर ही कारवाई केली जात आहे. शेतकऱ्याची मुलगी असलेल्या आकांक्षाला शिक्षणासाठी वसतिगृहाचा मोठा आधार आहे, अशा परिस्थितीत वसतिगृहातून काढून टाकणे म्हणजे तिच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळण्यासारखे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.
सध्या या प्रकरणाची नागपुरात मोठी चर्चा असून, प्रशासनाच्या या मनमानी कारभारावर टीकेची झोड उठत आहे.
शहर
- महाराष्ट्र: 'सरल' पोर्टलचा मोठा फटका; राज्यातील १५ ते २० हजार शिक्षकांवर 'बेरोजगारीची' टांगती तलवार!
- नागपूर: महावितरणच्या बदली प्रक्रियेत 'मॉडिफिकेशन गेम'चा आरोप; परिमंडळात गंभीर अनियमिततेची चर्चा
- बदलापूर हादरले: पुराच्या पाण्यात महिलेची उडी; आत्महत्येचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल, शोधकार्य सुरू
- ५० वर्षे जुना हॉटळे पूल पावसामुळे धोकादायक स्थितीत; दुरुस्तीसाठी ग्रामस्थांची प्रशासनाकडे तातडीची मागणी
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: 'सरल' पोर्टलचा मोठा फटका; राज्यातील १५ ते २० हजार शिक्षकांवर 'बेरोजगारीची' टांगती तलवार!
- नागपूर: महावितरणच्या बदली प्रक्रियेत 'मॉडिफिकेशन गेम'चा आरोप; परिमंडळात गंभीर अनियमिततेची चर्चा
- बदलापूर हादरले: पुराच्या पाण्यात महिलेची उडी; आत्महत्येचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल, शोधकार्य सुरू
- ५० वर्षे जुना हॉटळे पूल पावसामुळे धोकादायक स्थितीत; दुरुस्तीसाठी ग्रामस्थांची प्रशासनाकडे तातडीची मागणी
गुन्हा
- पश्चिम बंगाल: बारुईपूर १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा.
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!
- "E20 पेट्रोलमुळे बिघडलेली एक तरी गाडी दाखवा!" नितीन गडकरींचे टीकाकारांना थेट आव्हान.

























Subscribe to my channel



