नागपूर: रासायनिक खतांचे वितरण अधिक पारदर्शक, सुलभ आणि शेतकरीकेंद्री करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने 'फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल्स' (FFS) ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली व मोबाईल ॲप अमलात आणले जात आहे. नागपूर जिल्ह्यात या नव्या FFS प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना रासायनिक खतांचे ऑनलाइन बुकिंग करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना दुकानाबाहेर तासन् तास रांगेत उभे राहण्याची गरज उरणार नाही, तसेच खतांचा काळाबाजार, बोगस लिंकिंग आणि कृत्रिम टंचाईला पूर्णपणे आळा बसणार आहे.
FFS ॲप आणि QR कोडद्वारे खरेदी कशी होणार?
-
ॲप डाउनलोड व नोंदणी: शेतकरी हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक किंवा फार्मर आयडी टाकून ओटीपी (OTP) द्वारे लॉगिन करता येते.
-
ई-पीक पाहणी व जमिनीची नोंद: लॉगिन केल्यानंतर ई-पीक पाहणी व ७/१२ जमिनीच्या नोंदींनुसार शेतकऱ्याचे पीक व क्षेत्राची अचूक माहिती ॲपवर उपलब्ध होते. जमिनीच्या क्षेत्रानुसार पिकाला आवश्यक असणारा युरिया, डीएपी (DAP), एनपीके (NPK) आदी खतांचा डिजिटल कोटा ॲपद्वारे आपोआप निश्चित केला जातो.
-
खतांचे बुकिंग व केंद्र निवड: शेतकरी आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रातील प्रत्यक्ष खत साठा तपासून स्वतःच्या पसंतीचे दुकान निवडू शकतात आणि त्यांना आवश्यक असलेल्या खतांचे बुकिंग करू शकतात.
-
७२ तासांचा QR कोड: ॲपवर खताचे बुकिंग पूर्ण होताच शेतकऱ्याला एक डिजिटल 'QR कोड' (किंवा टोकन) प्राप्त होतो. हा QR कोड ७२ तास (३ दिवस) वैध (Valid) राहतो.
-
खतांचा पुरवठा: शेतकऱ्याने निवडलेल्या कृषी सेवा केंद्रावर जाऊन ई-पॉस (e-PoS) मशीनवर हा QR कोड स्कॅन करून सहजरीत्या आणि कोणत्याही अतिरिक्त लिंकिंगविना वाजवी शासकीय दरात खते खरेदी करता येतात. शेतकरी स्वतः किंवा त्यांचा अधिकृत प्रतिनिधी पाठवूनही ३ दिवसांच्या आत खत मिळवू शकतात.
या प्रणालीमुळे खत वितरणात शंभर टक्के पारदर्शकता येणार असून, प्रत्यक्ष गोदामातील साठा आणि ई-पॉसमधील डिजिटल साठा यांचा ताळमेळ राखणे सोपे होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी रांगांमधील गैरसोय टाळण्यासाठी एफएफएस (FFS) ॲपचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




